पत्नीला रील्स बनवण्याचा नाद, पुरुषांच्या कमेंट्सचा पतीला राग, दारुच्या नशेत लाथ घातली, अन्….

दोघांचेही हे दुसरे लग्न होते आणि फेसबुकवरच त्यांची मैत्री झाली होती. २१ एप्रिलच्या रात्री ही घटना घडली आहे. मृताचे नाव सुरेश बैगा असे आहे. आरोपी पत्नीने सांगितले की ती अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहे. आणि रील्स बनवून अपलोड देखील करते. जेव्हा कोणत्याही पुरूषाला त्या रील आवडायच्या तेव्हा तिच्या नवऱ्याला ते आवडत नसे.मध्य प्रदेशतील शहडोलमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पत्नीने तिच्या पतीचा गळा दाबून खून केला. गुन्हा लपवण्यासाठी ती पोलिसांना आणि तिच्या शेजाऱ्यांना दिशाभूल करत राहिली. आरोपी पत्नीने पोलिसांना सांगितले की, तिच्या पतीचा मृत्यू जास्त मद्यपानामुळे झाला आहे. पण, जेव्हा पोलिसांना संशय आला आणि त्यांनी कसून तपास केला तेव्हा ही हत्या असल्याचे निष्पन्न झाले.

जेव्हा पोलिसांनी हत्येचे कारण विचारले तेव्हा ते कारणही धक्कादायक निघाले.मिळालेल्या माहितीनुसार, दोघांचेही हे दुसरे लग्न होते आणि वरच त्यांची मैत्री झाली होती. मध्य प्रदेशतील शहडोल परिसरात २१ एप्रिलच्या रात्री ही घटना घडली आहे. मृताचे नाव सुरेश बैगा असे आहे. आरोपी पत्नीने सांगितले की ती अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहे. आणि रील्स बनवून अपलोड देखील करते. जेव्हा कोणत्याही पुरूषाला त्या रील आवडायच्या तेव्हा तिच्या नवऱ्याला ते आवडत नसे. या मुद्द्यावरून तिचे तिच्या पतीशी नेहमीच भांडण होत असत. तीने सांगितले की घटनेच्या रात्री सुरेश दारू पिऊन घरी आला. दारूच्या नशेत त्याने तिला मारहाण करायला सुरुवात केली.

आणि तिच्या मुलीला लाथ मारली.पत्नी राधा कोल हिच्यावर सुरेशची हत्या केल्याचा आरोप आहे, जो तिने कबूल केला. राधाने तिच्या पतीचा गळा दाबून खून केला होता. घटना लपवण्यासाठी तीने शेजाऱ्याला सांगितले की सुरेश दारू पिऊन घरी आला आहे, त्याने काही खाल्लेही नाहीये आणि तो उठतही नाही. शेजाऱ्यांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना तो मृत असल्याचे समजले. शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेहाची तपासणी केली. दरम्यान, पोलिसांना मृताच्या मानेवर नखांच्या खुणा आढळल्या. सुरेशचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला. संशयाच्या आधारे पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतले आणि तिची कसून चौकशी केली असता आरोपी पत्नीने हत्येची कबुली दिली. आणि संपूर्ण घटनाक्रम सांगितला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.