एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल तर्फे ऑनलाईन पोर्टलचे उद्घाटन.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल तर्फे ऑनलाईन पोर्टलचे उद्घाटन. आदिवासी बांधवांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध लोकोपयोगी योजनांचा लाभ अधिक सुलभ व पारदर्शक पद्धतीने थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या “https://itdpyawal.in/” या ऑनलाईन पोर्टलचे उद्घाटन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जळगावचे आमदार राजू मामा भोळे,

पाचोऱ्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली पंतप्रधानांच्या डिजिटल इंडिया संकल्पनेतून व मुख्यमंत्री यांच्या शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमास आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, राज्यमंत्री इंद्रनील नाईक तसेच आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त श्रीमती लीना बनसोड यांचे मार्गदर्शन लाभले.या पोर्टलची संकल्पना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावलचे प्रकल्प अधिकारी  अरुण पवार यांची असून त्यामध्ये न्यूक्लियस बजेट योजना,

आश्रमशाळा विद्यार्थी प्रवेश, ठक्कर बाप्पा योजना, वनहक्क कायदा, प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना, शबरी घरकुल योजना, वनधन योजना तसेच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा व वसतिगृह योजना अशा विविध लोकोपयोगी योजनांचा समावेश करण्यात आला आहे. या पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थ्यांना प्रकल्प कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची आवश्यकता न राहता, अर्ज ऑनलाइन सादर करता येणार आहे. अर्जाची स्थितीही लाभार्थ्याला पोर्टलद्वारे थेट कळविण्यात येईल.हा उपक्रम डिजिटल युगात आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.