जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव येथे 100 दिवसांच्या कृती आराखड्यानुसार प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव येथे 100 दिवसांच्या कृती आराखड्यानुसार प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित. शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी शासनाच्या 100 दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव येथे दिनांक 23 ते 25 एप्रिल 2025 या कालावधीत तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यशाळा छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये संपन्न झाली.

दिनांक 23 एप्रिल रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी  रविंद्र नाईक यांनी “क्रीडा विभागाच्या योजना व उपक्रम” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. दिनांक 24 एप्रिल रोजी प्रा. डॉ.  अशोक पवार यांनी “माहिती अधिकार अधिनियम व लोक सेवा हक्क कायदा” या विषयावर प्रशिक्षण दिले. त्यानंतर, दिनांक 25 एप्रिल रोजी मानसोपचार तज्ञ डॉ. निरज देव यांनी “कामातील ताण-तणावाचे व्यवस्थापन” या विषयावर मार्गदर्शन केले.

तसेच  कैलास सोनार, अप्पर कोषागार अधिकारी यांनी “महाराष्ट्र नागरी सेवा नियम व वित्तीय कामकाज व नियमावली” याबाबत माहिती दिली.यासोबतच, दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी मिलिंद बुवा यांचे “कार्यालयीन कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर” या विषयावर विशेष प्रशिक्षण सत्र होणार आहे.या प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच मानधन कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.