फैसला ऑन दी स्पॉट! 5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, महिला PSI कडून आरोपीचा एन्काऊंटर.

रितेश कुमार गेल्या दोन-तीन महिन्यांपासून हुबळीत मजुरी करत होता. त्याने मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून स्वत:सोबत नेले. मुलीचा मृतदेह एका पत्र्याच्या शेडमध्ये सापडला.पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्याप्रकरणातील  आरोपीचा हुबळी पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे हुबळी शहरात प्रक्षोभ निर्माण झाला होता. पाच वर्षाची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार विजयनगर  पोलिस स्थानकात दाखल झाली होती. सीसीटीव्ही आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रितेश कुमार  (वय 35) याला अटक केली होती. त्याच्याकडून अधिक माहिती घेण्यासाठी पोलीस त्याच्या घरी घटनास्थळी  घेऊन गेले होते. तेथे  रितेश कुमार याने पोलिसांवर हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी फौजदार अन्नपूर्णा यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून हवेत गोळी झाडली. पण तरीही रितेश कुमार पळून जात होता. त्यामुळे फौजदार अन्नपूर्णा यांनी  त्याच्या पायावर  आणि पाठीवर गोळ्या झाडल्या. जखमी झालेल्या रितेश कुमार याला उपचारासाठी किम्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले पण तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दरम्यान, या घटनेत एक पीएसआय आणि दोन कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या किम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपीने मुलीला चॉकलेट देण्याचे आश्वासन देऊन तिचे अपहरण केले आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला. नंतर त्याने गळा दाबून तिची हत्या केली. यानंतर नराधमाने तिचा मृतदेह एका पत्र्याच्या शेडमध्ये ठेवून दिला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर हुबळीत प्रचंड जनक्षोभ निर्माण झाला होता. अशोक नगर पोलीस ठाण्याबाहेर हजारो संतप्त नागरिकांचा जमाव जमला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला शोधण्यासाठी शोधमोहीम हाती घेतली होती. त्यानंतर रितेश कुमारला ताब्यात घेण्यात आले होते. रितेश कुमार हा बिहारच्या पाटणा येथील रहिवासी आहे. तो हुबळीत कामासाठी वास्तव्याला होता. पोलिसांनी शोधमोहीम सुरु केल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रितेश कुमार याला शोधून काढले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी विजयनगर परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये पाच वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडला होता. या मुलीची आई घरकाम करायची.

घरकामासाठी जाताना आई तिच्या मुलीला सोबत घेऊन जायची. आई एका घरी काम करत असताना रितेश कुमारने मुलीचे अपहरण केले होते. यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध सुरु केला तेव्हा पत्र्याच्या एका शेडमधील बाथरुममध्ये मुलीचा मृतदेह सापडला होता.  याप्रकरणी आम्ही रितेश कुमार या आरोपीला ताब्यात घेतले होते. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याने आमच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केला. त्याने केलेल्या दगडफेकीत पोलिसांच्या वाहनाचे नुकसान झाले. त्यावेळी पीएसआय अन्नपूर्णा यांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात रितेश कुमार मारला गेला. रितेश कुमार याच्या छाती आणि पायावर गोळी लागली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, अशी माहिती हुबळी-धारवाडचे पोलीस आयुक्त एन. शशी कुमार यांनी दिली.

  • Related Posts

    सीमा हैदरला सुद्धा बोजा गुंडाळून अवघ्या 48 तासात पाकिस्तान वापसी करावीच लागणार? वकिलाने तातडीने दिली महत्वाची माहिती.

    सीमा हैदर नेपाळमार्गे भारतात आली आणि तिने भारतीय तरुण सचिन मीनाशी लग्न केले होते. ती उत्तर प्रदेशातील रघुपूर गावात तिच्या सासरच्यांसोबत राहत आहे आणि तिने अलीकडेच एका मुलीला जन्म दिला…

    पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया.

    काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावर शरद पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी (दि. 22) रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terror Attack)…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    सीमा हैदरला सुद्धा बोजा गुंडाळून अवघ्या 48 तासात पाकिस्तान वापसी करावीच लागणार? वकिलाने तातडीने दिली महत्वाची माहिती.

    सीमा हैदरला सुद्धा बोजा गुंडाळून अवघ्या 48 तासात पाकिस्तान वापसी करावीच लागणार? वकिलाने तातडीने दिली महत्वाची माहिती.

    पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया.

    पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया.

    हिनेच सुपारी देऊन…; पहलगाममध्ये पती गमावणाऱ्या महिलेबद्दल संतापजनक पोस्ट; ओसाफ नेमका कोण?

    हिनेच सुपारी देऊन…; पहलगाममध्ये पती गमावणाऱ्या महिलेबद्दल संतापजनक पोस्ट; ओसाफ नेमका कोण?

    मनिषा मानेंनी माफीनामा लिहून दिलेला, वकिलाचा दावा, डॉ. वळसंगकरांच्या प्रकरणात नवा ट्विस्ट.

    मनिषा मानेंनी माफीनामा लिहून दिलेला, वकिलाचा दावा, डॉ. वळसंगकरांच्या प्रकरणात नवा ट्विस्ट.