फुलांच्या पायघड्या, ढोल ताशांच्या गजर, भाविकांच्या अलोट गर्दीत श्री करवीर निवासिनी अंबाबाईचा रथोत्सव संपन्न.

वर्षातून एकदा आई अंबाबाई देवी नगरवासीयांची भेट घेण्यास बाहेर पडत असते. तर या शाही सोहळ्याला याची देही याची डोळा प्रत्यक्ष साक्षीदार होण्यासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती.अंबा माता की जयचा गजर, रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या, ढोल ताशाचा गजर, भालदार, चोपदार, विद्युत रोषणाई फुलांनी सजलेला रथ असा लवाजमा आणि त्यात विराजमान करवीर निवासिनी अंबाबाईची उत्सवमूर्ती आणि रथावर होणार फुलांचा वर्षाव. अशा मंगलमय वातावरणात रविवारी रात्री  अंबाबाई देवीचा रथोत्सव सोहळा पार पडला. जोतिबा चैत्र यात्रेच्या दुसऱ्या दिवशी दरवर्षी हा सोहळा पार पाडतो. वर्षातून एकदा आई अंबाबाई देवी नगरवासीयांची भेट घेण्यास बाहेर पडत असते. तर या शाही सोहळ्याला याची देही याची डोळा प्रत्यक्ष साक्षीदार होण्यासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती.कोल्हापूरमध्ये नेहमीच विविध धार्मिक उत्सव होत असतात. मात्र या विविध उत्सवांत  करवीर निवासिनी अंबाबाईच्या रथोत्सवाच विशेष महत्त्व आहे. कोल्हापुरातील या रथोत्सवास फार जुनी परंपरा असून दख्खनचा राजा जोतिबाची मुख्य चैत्र यात्रेच्या दुसऱ्या दिवशी अंबाबाई चा रथोत्सव सोहळा पार पडत असतो.

त्यानुसार यंदा ही ज्योतिबा यात्रेच्या दुसऱ्या दिवशी अंबाबाई मंदिरात रात्री साडेनऊ वाजता तोफेची सलामी दिल्यानंतर ‘अंबा माता की जय’च्या जयघोषात रथोत्सवाला सुरुवात झाली. सुंदर अशा पद्धतीने सजवलेले देवीचे रथ आणि रथापुढे मानाचा घोडा होता तर रथावर देवीचा चोपदार, हवालदार, मशाल आणि सुरक्षा रक्षक होते. परंपरागत वाद्यांच्या गजरात अंबाबाई मंदिरापासून रथोत्सवाला प्रारंभ झाला. प्रदक्षिणा मार्गावर ठिकठिकाणची पुष्पवृष्टी आणि नेत्रदीपक आतिषबाजी करण्यात येत होती.तर आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथामध्ये अंबाबाईची उत्सवमूर्ती सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडणारी दिसत होती. बँड पथके, ढोल ताशा पथके, चौऱ्या आणि मोर्चेल धरणारे सेवक, अशा लवाजम्यासह हा रथ नगरप्रदक्षिणेसाठी महाद्वार चौक, महाद्वार रोडमार्गे , गुजरी कॉर्नर येथे आला यावेळी न्यू गुजरी मित्र मंडळातर्फे गुजरी कॉर्नर येथे आतिषबाजी करण्यात आली. येथून रथ पुढे मार्गस्थ झाला आणि भवानी मंडपमार्गे तुळजाभवानी मंदिरासमोर आल्यानंतर देवीची आरती करण्यात आली.

दरम्यान रथोत्सवात ठिकठिकाणी पुष्पवृष्टीसह प्रसादवाटप, सरबतवाटपही सुरू होते. तर हा सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण हजारो कोल्हापूरकर रथोत्सव मार्गावर उतरले होते तर अनेकांनी आपल्या कॅमेरामध्ये हा सोहळा टिपण्याचा प्रयत्न केला.जोतिबा डोंगरावरील चैत्र यात्रेच्या दुसऱ्या दिवशी  करवीर निवासिनी अंबाबाईचा रथोत्सव पार पडत असतो. साडेनऊ वाजता तोफेच्या सलामीने देवीचा रथ मंदिरातून बाहेर पडतो. मंदिराभोवतीने प्रदक्षिणा घालत अंबाबाई देवीचा रथ महाद्वाररोड, गुजरी, भवानी मंडप, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर चौक या मार्गावरून पुढे जात पुन्हा मंदिरात परत येत असतो. यावेळी या मार्गावर आकर्षक फुलांच्या रांगोळ्या काढलेल्या असतात. तर काही ठिकाणी सामाजिक संदेश देणारे रांगोळ्या देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात मात्र यंदा  महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या वतीने महाद्वार रोड येथे आकर्षक अशी विद्युत रोषणाई केली होती जी प्रत्येकाच आकर्षणबिंदू ठरत होती.

  • Related Posts

    उशिरा येण्याचं कारण विचारलं, डॉक्टरांना राग अनावर, वृद्धाला बेदम मारहाण करत फरफटत रुग्णालयाबाहेर नेलं.

    जिल्हा रुग्णालयात एका डॉक्टरने ७७ वर्षांच्या वृद्ध व्यक्तीला मारहाण केली आहे.मारहाण केल्यानंतर डॉक्टरच्या सांगण्यावरून २ लोकांनी मिळून त्या वृद्ध व्यक्तीला ओपीडीमधून फरफटत रुग्णालयाच्या बाहेर नेले.डॉक्टर हे देवाचे रूप असतात, असे…

    आपण गेम करणार आहोत; दुचाकीच्या वादातून दाजी-मेहुण्याचा जीव घेतला, मृत तरुणाची पत्नीच ताब्यात, महाराष्ट्रात खळबळ.

    आसिफ आणि हिना यांची ओळख झाली. दोघांचे सूत जुळले. हिना खान हिला आपण गेम करणार आहोत अशी माहिती दिली होती, आरोपी आसिफ यांनी प्राथमिक चौकशी दरम्यान दिली.दुचाकी न मिळाल्याच्या कारणावरून…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    उशिरा येण्याचं कारण विचारलं, डॉक्टरांना राग अनावर, वृद्धाला बेदम मारहाण करत फरफटत रुग्णालयाबाहेर नेलं.

    उशिरा येण्याचं कारण विचारलं, डॉक्टरांना राग अनावर, वृद्धाला बेदम मारहाण करत फरफटत रुग्णालयाबाहेर नेलं.

    आपण गेम करणार आहोत; दुचाकीच्या वादातून दाजी-मेहुण्याचा जीव घेतला, मृत तरुणाची पत्नीच ताब्यात, महाराष्ट्रात खळबळ.

    आपण गेम करणार आहोत; दुचाकीच्या वादातून दाजी-मेहुण्याचा जीव घेतला, मृत तरुणाची पत्नीच ताब्यात, महाराष्ट्रात खळबळ.

    गाढ झोपेत असताना अचानक स्फोटाचा आवाज, आकाशातून कोसळला धातूचा तुकडा, नागपुरात खळबळ.

    गाढ झोपेत असताना अचानक स्फोटाचा आवाज, आकाशातून कोसळला धातूचा तुकडा, नागपुरात खळबळ.

    कुटुंबासोबत वॉटर पार्कला गेली ती परत आलीच नाही; एक चूक आणि होत्याचं नव्हतं झालं, काय घडलं?

    कुटुंबासोबत वॉटर पार्कला गेली ती परत आलीच नाही; एक चूक आणि होत्याचं नव्हतं झालं, काय घडलं?