जिल्हा रुग्णालयात एका डॉक्टरने ७७ वर्षांच्या वृद्ध व्यक्तीला मारहाण केली आहे.मारहाण केल्यानंतर डॉक्टरच्या सांगण्यावरून २ लोकांनी मिळून त्या वृद्ध व्यक्तीला ओपीडीमधून फरफटत रुग्णालयाच्या बाहेर नेले.डॉक्टर हे देवाचे रूप असतात, असे म्हटले जाते. पण मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात एका डॉक्टरचा क्रूर चेहरा समोर आला आहे. छतरपूर जिल्हा रुग्णालयात एका डॉक्टरने ७७ वर्षांच्या वृद्ध व्यक्तीला मारहाण केली आहे.मारहाण केल्यानंतर डॉक्टरच्या सांगण्यावरून २ लोकांनी मिळून त्या वृद्ध व्यक्तीला ओपीडीमधून फरफटत रुग्णालयाच्या बाहेर नेले. तिथे नेऊन त्यांना जमिनीवर आदळले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.ही घटना १७ एप्रिलची आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दोन लोक एका ७७ वर्षांच्या वृद्ध व्यक्तीला फरफटत नेत आहेत.










