खंडाळा बोर घाटात भीषण अपघात झाला असून या अपघातात बाप – लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातानंतर वाहन चालक फरार झाला आहे.खंडाळा बोर घाटात जुन्या मुंबई – पुणे महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव ट्रकने पाच वाहनांना जोरदार धडक दिल्याने एका बाप – लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर १२ जण जखमी झाले आहेत. रविवारी रात्री हा अपघात झाला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या दिशेने जाणारा एक ट्रक खंडाळा घाटातील तीव्र उतारावरून अनियंत्रित होऊन समोरून येणाऱ्या पाच वाहनांना धडकला. यात एका कारमधील बाप आणि त्याच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. जखमींमध्ये तीन जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.










