महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या जळगांव जिल्हा नूतन कार्यकारिणी व राज्य कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार.

महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या जळगाव जिल्हा समितीच्या वतीने रविवार २० एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता नवनियुक्त कार्यकारिणीच्या सत्कार सोहळ्याचे आणि सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास जिल्ह्यातील अनेक योगशिक्षक, पदाधिकारी व योगप्रेमी उपस्थित होते. सुरुवातीला ओंकार आणि महामुनी पतंजली यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्रिवार ओंकार आणि गुरुवंदनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.

महासचिव पांडुरंग सोनार यांनी मागील बैठकीचा अहवाल तसेच प्रोसिडिंग बुकमधील नोंदी वाचून दाखवल्या. कोषाध्यक्ष नूतन जोशी यांनी आर्थिक स्थितीचा सविस्तर आढावा सादर केला. यानंतर मागील वर्षभर कार्यरत असलेल्या मावळत्या कार्यकारिणीचे विशेष अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्वांना सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.

नवीन कार्यकारणी सदस्यांचा झाला सत्कार चित्रा महाजन – जिल्हाध्यक्ष, डॉ.शरयू विसपुते – उपाध्यक्ष, पांडुरंग सोनार – महासचिव, नूतन जोशी – कोषाध्यक्ष सोनाली पाटील – सचिव, अर्चना गुरव – सचिव, वैशाली भारंबे – सहसचिव, प्रिया दारा – संघटन सचिव, जितेंद्र कोतवाल – मिडीया प्रभारी, रोहन चौधरी – सोशल मिडीया प्रभारी, कविता चोपडे – कार्यालय सचिव, ॲड.स्वाती निकम – महिला प्रकोष्ठ प्रभारी

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.