
विठुदुर्ग बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने शैक्षणिक साहित्य वाटप भडगाव : शहरातील यशवंत नगर भागातील बुद्ध विहार या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त जयहिंद लोकचळवळ, भडगाव तालुका व विठुदुर्ग बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून या उपक्रमाद्वारे अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाली.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वही, पुस्तकं, पेन, पेन्सिल, व इतर साहित्य वाटण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणविषयक विचारांची प्रेरणा घेतली गेली.
“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या बाबासाहेबांच्या विचारांची आठवण करून देत विद्यार्थ्यांना शिक्षणात पुढे जाण्यासाठी प्रेरित करण्यात आले. या वेळी जयहिंद लोकचळवळ भडगाव समन्वयक अशुत्तोषकुमार पाटील,कमलेश सोनवणे, वैभव कासार, विठुदुर्ग बहुउद्देशीय संस्था संस्थापक यशकुमार पाटील, रुपेश ब्राम्हणे, तथागत बाविस्कर, जिग्नेश पाटील, सुभाष अहिरे, सुनिल पवार, चळवळीतील कार्यकर्ते, स्थानिक नागरिक, यासह विद्यार्थी व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.