आधी दरड कोसळली, मग पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा थयथयाट, महाराष्ट्रातील दाम्पत्याचा थरारक प्रवास.

 22 एप्रिलला पहलगामवरून ते परतीच्या प्रवासाला निघण्याच्या तयारीत होते. त्यावेळी पहलगाममध्ये अचानक दहशतवाद्यांनी काही पर्यटकांवर हल्ला केला.पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील दोन पर्यटकही त्याठिकाणी अडकले होते. 23 एप्रिल रोजी त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला, तरी या घटनेने संपूर्ण कुटुंब प्रचंड दहशतीत होते.पुसद पंचायत समितीचे निवृत्त कर्मचारी रमेश सोनकुसरे आणि त्यांचा पत्नी सुनंदा सोनकुसरे हे दोघेही नऊ एप्रिलला पुसद येथून वर्धा येथे गेले. त्या ठिकाणावरून काही निवडक नातेवाईकांसह ते जम्मू-काश्मिरच्या प्रवासाला निघाले होते. 21 एप्रिलपर्यंत त्या भागात पर्यटन करून निघण्याच्या बेतात असताना त्या दिवशी त्या परिसरातील दरड कोसळून तेथील महामार्ग बंद पडला होता. त्यामुळे एक दिवसाचा प्रवास रद्द झाला.दुसऱ्या दिवशी, 22 एप्रिलला पहलगामवरून ते परतीच्या प्रवासाला निघण्याच्या तयारीत होते. त्यावेळी पहलगाममध्ये अचानक दहशतवाद्यांनी काही पर्यटकांवर हल्ला केला.

त्यावेळी ते रिसॉर्टमध्ये निघण्याची तयारी करीत होते. अचानक झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच सर्व पर्यटक प्रचंड दहशतीत आले होते. परंतु रिसॉर्टमध्ये असल्यामुळे ते सुरक्षित होते.त्या घटनेचे वृत्तांत टीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण देशात घराघरांत पोहोचले. माहिती मिळताच त्यांचा घरचे सदस्यही प्रचंड घाबरले होते. त्यानंतर त्यांनी मुलाशी संपर्क झाल्याने व सर्व पर्यटक सुरक्षित असल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले. काल सकाळी पहलगामवरुन जम्मू काश्मिर व तेथून कटारा आणि पुढे दिल्ली, असा त्यांचा प्रवास झाल्याचे त्यांच्या मुलांनी सांगितले.दुसरीकडे, पहलगामधील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कौस्तुभ गनबोटे यांचे काका प्रभाकर हेदेखील कुटुंबीयांसोबत काश्मीरच्या सहलीसाठी गेले होते. मात्र, कौस्तुभही काश्मीरला आल्याची कल्पना त्यांना नव्हती. प्रभाकर यांचे कुटुंबीय शुक्रवारीच काश्मीरमध्ये दाखल झाले.मंगळवारी दुपारी त्यांनी पहलगाम सोडले आणि काही वेळातच तिथे हल्ला झाला. प्रभाकर व त्यांचे कुटुंबीय पाम्पोरजवळ असताना या हल्ल्याची माहिती त्यांच्या कानावर आली. श्रीनगरला पोहोचल्यानंतर त्यांनी घटनेचे गांभीर्य कळाले. रात्री अकराच्या सुमारास त्यांना एका परिचिताचा फोन आला.

या हल्ल्यात गनबोटे जखमी झाल्याचे वृत्तवाहिन्यांवर दिसते आहे, असे सांगून त्यांनी प्रभाकर यांची विचारपूस केली. त्यानंतर त्यांना कौस्तुभही तिथे असल्याचे समजले. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.बुधवारी विशेष विमानाद्वारे प्रभाकर गनबोटे व त्यांचे कुटुंबीय मुंबईमार्गे पुण्यात आले. त्यासाठी प्रत्येकी २२ हजार रुपयांचे तिकीट त्यांनी काढले. याच विमानातून दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या मुंबईतील चौघांचे मृतदेहही आणण्यात आले. ‘कौस्तुभने कायम आपल्या फरसाणाच्या व्यवसायाला वाहून घेतले होते. आता सर्व स्थिरस्थावर असल्याने फिरायला जा, असा आग्रह सर्वांनी केल्याने तो पहिल्यांदाच सहलीसाठी काश्मीरला गेला. फरसाणच्या व्यवसायात त्याने चांगला जम बसवला होता. त्यात त्याने अनेक प्रयोग केले. फरसाण तळून झाल्यानंतर त्यातील तेलाचे प्रमाण कमीत कमी व्हावे, यासाठी त्याने खूप प्रयत्न केले. त्यात त्याला यशही मिळाले होते,’ असे प्रभाकर यांनी सांगितले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.