पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारकडून चूक मान्य? घटनास्थळी सुरक्षा का नव्हती, समोर आलं मोठं कारण.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर गुरुवारी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक झाली. विरोधी पक्षांनी सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यात सरकारने सुरक्षेत चूक झाल्याची कबुली देत चौकशीचे आदेश दिले.जम्मू – काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, सरकारने गुरुवारी संध्याकाळी संसद भवनात सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि इतर विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीत विरोधी पक्षांनी हल्ला झाला त्यावेळी सुरक्षा दल, सीआरपीएफ कुठे होतं? मदत पोहोचायला इतका उशिर का झाला? असे प्रश्न उपस्थित केले.पहलगाम हल्ल्यात बचावलेल्या आणि गोळीबाराच्या हल्ल्याचा थरार आपल्या डोळ्यांनी अनुभवलेल्या प्रत्यक्षदर्शींनी, पर्यटकांनी दिलेल्या माहितीनुसार, पहलगामच्या बैसरन खोऱ्यात गोळीबार करण्यात आला त्यावेळी तिथे कोणतेही सुरक्षा रक्षक तैनात नव्हते.

सुरक्षा रक्षक का तैनात नव्हते याची माहिती समोर आली आहे.या बैठकीत बोलताना अमित शाह यांनी पहलगाममधील सुरक्षेमध्ये चूक झाल्याची कबूली दिली आहे. तसंच याप्रकरणी चौकशीचे आदेशही दिले आहेत. या बैठकीत घटना कशी घडली, नेमकी चूक कुठे झाली याबाबत चर्चा झाली. या बैठकीत झालेल्या चर्चांवेळी माहिती देताना सांगण्यात आलं, की हा मार्ग अमरनाथ यात्रा सुरू झाल्यानंतर जून महिन्यात उघडला जातो. याच भागात अमरनाथ यात्रेसाठी आलेले भाविक विश्रांती घेतात. पण यावर्षी सरकारला कोणतीही माहिती न देता स्थानिक टूर ऑपरेटर्सनी या भागात पर्यटकांच्या बुकिंग जून आधीच घेण्यास सुरुवात केली. तो परिसर स्थानिक अधिकाऱ्यांनी विनासूचना पर्यटकांसाठी खुला केला.

स्थानिक अधिकाऱ्यांनी पोलिसांनाही याची माहिती दिली नव्हती. २० एप्रिलपासून तिथे पर्यटक येऊ लागले. त्यामुळेच त्या भागात सुरक्षा व्यवस्था तैनात नसल्याची माहिती आहे.या हल्ल्याची द रेजिस्टेंट फ्रंट या दहशतवादी संघटनेने जबाबदारी घेतली आहे. ही संघटना पाकिस्तानातील लष्कर-ए-तैयबाशी संबंधित आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला. ज्यात २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाचा समावेश आहे. २० हून अधिक लोक या हल्ल्यात जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी M4 कार्बाइन आणि AK-47 सारख्या हत्यारांचा वापर केला. भारतीय सेना, CRPF आणि जम्मू-काश्मीर पोलिसांकडून संयुक्तपणे सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे, अशी माहिती अमित शाह यांनी दिली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.