ग्रामदैवताच्या यात्रेहून आले, घराच्या ओट्यावर निवांत झोपले, मद्यधुंद पोलीसाची गाडी धडकली अन् तिथंच…

मद्यधुंद अवस्थेतील पोलीस कर्मचाऱ्याने घरासमोर झोपलेल्या रमेश संकपाळ यांना चिरडले. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून दोषीवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.कोरेगाव तालुक्यातील सर्कलवाडी गावात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घरासमोर झोपलेल्या एका व्यक्तीला भरधाव वेगात आलेल्या मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याने कार खाली चिरडले. या अपघातात रमेश लक्ष्मण संकपाळ (रा. सर्कलवाडी, ता. कोरेगाव, जि सातारा) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्या घटनेची नोंद वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात झाली असून ज्ञानेश्वर बाबुराव राजे (रा. वाघोली, ता. कोरेगाव, जि. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे सर्कलवाडी (ता कोरेगाव, जि. सातारा) गावाच्या हद्दीत वाई ते वाठार स्टेशन रस्त्यावरून जात असताना पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात कार (MH 12 GR 2926) मद्यधुंद अवस्थेत, हलगर्जीपणाने आली.

रमेश लक्ष्मण संकपाळ हे घरासमोर ओट्यावर झोपले असता त्यांच्या डोक्यावरून कार गेल्याने गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.या घटनेच्या वेळी वाहन चालवणारा पोलीस कर्मचारी ही मद्यधुंद अवस्थेत होता. कार चालवणारा व्यक्ती पोलीस खात्यात काम करणारा असल्याचं प्राथमिक तपासातून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे लोकांचा संताप आणखीनच वाढला आहे. रमेश लक्ष्मण संकपाळ हे गुरुवारी ग्रामदैवत जानुबाई देवीची यात्रा असल्याने गावात देवीचा छबीन्याचा कार्यक्रम आटोपून पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घरासमोर ओट्यावर झोपले होते.त्यानंतर पहाटे ३ वाजून १५ मिनिटांनी भरधाव कार थेट त्यांच्या अंगावर आली. रस्ता मोकळा असूनही चालकाने निष्काळजीपणे गाडी चालवत त्यांच्या डोक्यावरून नेल्याने ते जखमी होऊन जागीच मृत्यू झाला.

तर कार चालकास किरकोळ दुखापत झाली आहे. रस्ता मोकळा असूनही चालकाने वेग न थांबवता निष्काळजीपणे गाडी चालवल्याने गाढ झोप येत असलेल्या एकाचा हकनाक बळी गेला आहे.या घटनेनंतर सर्कलवाडी गावात संतापाचं वातावरण आहे. जे पोलीस आपली सुरक्षा करतात, त्यांच्याच बेजबाबदार वागणुकीमुळे निरपराध लोकांचा बळी जात आहे. रमेश संकपाळ हे गावात शांत, मदतीला तत्पर आणि सर्वांशी प्रेमाने वागणारे व्यक्तीमत्त्व होते. त्यांच्या जाण्याने संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे. या घटनेतील दोषीवर कडक कारवाई करत सपकाळ कुटुंबियांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.या अपघाताचा ऋतुराज कृष्णात संकपाळ यांनी वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलीस हवालदार जाधव करत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.