
सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव रस्त्यावर दोन जीवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. देवीच्या जत्रेतून परत येताना अनर्थ घडला. संपूर्ण गावात घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.दोन मित्रांचा एकाच वेळी दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तुकाई देवीच्या यात्रेतून एकाच दुचाकीने ४ मित्र घराकडे परतत होते. त्याचवेळी आरो प्लांटच्या भिंतीवर दुचाकी धडकल्याने अपघात झाला. दोन जिवलग मित्रांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव रस्त्यावर झाला.आकाश अंबादास वाघ – वय वर्ष १९, राहणार पिंपळगाव घाट ह. मु. आमठाणा तालुका सिल्लोड, विशाल पांडुरंग गायसमिंद्रे – वय वर्ष २४, राहणार आमठाणा अशी अपघातात मृतांची नाव आहे. तर अनिकेत दत्तू जगताप वय १६, रितेश अंबादास साळवे १८ अशी जखमींची नावं आहेत.
दरम्यान या प्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, जांभई येथे तुकाईदेवीची यात्रा सुरू आहे. या यात्रेसाठी आकाश, विशाल, रितेश आणि अनिकेत हे चार मित्र दुचाकीने गेले होते. यात्रेत देवीच दर्शन करून एकाच दुचाकीने चौघे घरी परतत होते. ते जांभई गावापासून पुढे आले. मात्र तिथे काही अंतरावर असलेल्या आरो प्लांटच्या भिंतीवर त्यांची दुचाकी धडकली. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने आरो प्लांटच्या भिंतीवर दुचाकी धडकल्याची माहिती आहे. यामध्ये दुचाकी वरील चौघेजण गंभीर जखमी झाले.दरम्यान स्थानिकांनी चौघांना तातडीने सिल्लोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी आकाश आणि विशाल या दोघांना तपासून मृत घोषित केलं.
तर अनिकेत, रितेश हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सिल्लोड पोलीस ठाण्यामध्ये अपघाताची नोंद करण्यात आली आहे. या भीषण अपघातामुळे गावावर शोककळा पसरली आहे.आकाश वाघ हा पाच वर्षांचा असताना त्याच्या आईवडिलांचा मृत्यू झाला होता. यामुळे तो अनाथ झाला होता. आमठाणा येथे आकाशची आत्या रेखा खरात या राहतात. आकाशच्या आई-वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या त्याच्या आत्याने त्याचा सांभाळ केला. आई-वडिलांच्या निधनानंतर आकाशचाही मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Video Player
00:00
00:00