
महाराष्ट्राच्या राजकारणात नारायण राणे आणि उद्धव ठाकरे हा संघर्ष जुना आहे. उद्धव ठाकरे यांच्या आगामी काळातील कोकण दौऱ्यावरून भाजपचे ज्येष्ठ नेते तथा खासदार नारायण राणे यांनी आज पुन्हा उद्धव ठाकरेंवर तोफ डागली आहे.महाराष्ट्राच्या राजकारणात नारायण राणे आणि उद्धव ठाकरे हा संघर्ष जुना आहे. उद्धव ठाकरे यांच्या आगामी काळातील कोकण दौऱ्यावरून भाजपचे ज्येष्ठ नेते तथा खासदार नारायण राणे यांनी आज पुन्हा उद्धव ठाकरेंवर तोफ डागली आहे. ‘कोकणात उद्धव ठाकरे येतो, ते फक्त मासे मटण वडे खाण्याकरताच येतो, म्हणून मी येथील व्यवसायिकांना सांगितलं आहे. त्या दिवशी मटण वडे, मासे बंद ठेवा’ अशी उपरोधिक टीका नारायण राणे यांनी ठाकरेंवर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या डीपीडीसीच्या बैठकीला आज खासदार नारायण राणे उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
नारायण राणे म्हणाले, ‘उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना मिळालेल्या पैशांची आकडेवारी जरा मागवा. तो कोकणात येणारही नाही, नाहीतर मी तुम्हाला आकडेवारी देईन. त्याने किती पैसे सिंधुदुर्गला दिले? असाही खडा सवाल राणे यांनी उपस्थित केला आहे. मग कळेल काय अधिकार आहे त्यांना कोकणावर बोलायचा. म्हणून मी हॉटेलवाल्यांना सांगितलं की, कोंबडी वडे आणि मासे बंद करा. ज्या दिवशी तो येईल त्या दिवशी दुसरं काही करत नाही तेवढेच खायला तो येतो.चिपी विमानतळावरून आता सेवा पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाली आहे, यावर राणे माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, आता इंडिगो पण येणार सगळे येणार आता ते कधी बंद होणार नाही.