
पुण्यात अत्यंत चिड आणणारी घटना घडली आहे. येथे एका पाळीव कुत्रीवर मालक घरी नसताना शेजाऱ्याने या कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे.पुण्यात दर दुसऱ्या दिवशी एक भयंकर घटना समोर येत आहे. आता हडपसर परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका विकृत इसमाने श्वानावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणी काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाहेर गावरून आल्यावरून सीसीटीव्ही तपासल्यानंतर आज घटना समोर आली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव हलीमुद्दीन शेख (वय 20 वर्षे सध्या राहणार सुंदर सोसायटी, हांडेवाडी, हडपसर, पुणे मूळ राहणार गाव कांदोरी थाना खडगाव जिल्हा मुर्शिदाबाद पश्चिम बंगाल) असून तो मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी आहे.
सध्या तो हडपसरमधील हांडेवाडी परिसरात वास्तव्यास आहे. कुत्र्याचा मालक काही कामानिमित्त परगावी गेला असता ही घटना घडली आहे.फिर्यादी हे त्यांचे मूळ गावी गेले असताना आरोपी याने 26 मार्चला रात्री साडे अकराच्या सुमारास अनाधिकृतपणे फिर्यादी यांच्या पार्किंगमध्ये येऊन फिर्यादी यांची कुत्री (पेनी वय 5 वर्ष) हिच्याशी अनैसर्गिक कृत्य केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आरोपीला ताब्यात घेऊन तपास केला असता आरोपी याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर फिर्यादी यांची तक्रार देऊन पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
आरोपी हा पोलिसांच्या ताब्यात असून त्याचे कागदपत्र पडताळणी (आधार इलेक्शन कार्ड शाळेचे प्रमाणपत्र) केली असून तो पश्चिम बंगाल येथील रहिवासी असल्याचे कागदपत्रांवरून निष्पन्न होत आहे. सदर भागात शांतता असून कायदा व सुव्यवस्थेचा काही प्रश्न नाही.सदर घटनेची माहिती शिवसेना (शिंदे गट) चे पदाधिकारी राजेश पळसकर यांच्यासह इतर स्थानिक नागरिकांना देण्यात आली. त्यांनी तात्काळ यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
Video Player
00:00
00:00