
छत्रपती संभाजीनगरच्या बन्सीलाल नगरात २० दिवसांपासून तरुणींची छेड काढणाऱ्या गजानन गडदे याला पोलिसांनी अटक केली आहे. तो दुचाकीवरून येऊन तरुणींना गैर ठिकाणी स्पर्श करत होता, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. CCTV फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला शोधून काढले असून, त्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या बन्सीलाल नगर मध्ये गेल्या वीस दिवसांपासून तरुणींची छेड काढण्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. दुचाकी वर येऊन तरुणींना नको त्या ठिकाणी स्पर्श करून छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी तांत्रिक तपास करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.गजानन दत्ताराव गडदे वय 22 रा. हट्टा पाटील तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली ह.मु.कैलास नगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की छत्रपती संभाजी नगर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरामध्ये बन्सीलाल नगर आहे.
शहरातील बन्सीलाल नगर उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखले जाते. या वसाहतीपासून आसपास शाळा महाविद्यालय व खाजगी क्लासेस असल्याने या ठिकाणी विद्यार्थ्यांची वर्दळ असते. या ठिकाणच्या अनेक घरमालकांनी विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी हॉस्टेल तयार केले आहेत. यामुळे यात परिसरात मोठ्या प्रमाणात तरुण तरुणी राहतात.दरम्यान, या गोष्टीचा गैरफायदा घेत गजानन गडदे हा विकृत तरुण दुचाकी वर फिरत होता. तरुणी किंवा महिला दिसली की पाठीमागून घेऊन नको त्या ठिकाणी स्पर्श करून छेड काढत होता. ज्या घटनेमुळे परिसरातील महिला आणि तरूणी घाबरून गेल्या होत्या. दरम्यान हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता. अनेक तरूणींनी आधी कोणाला काही सांगितलं नाही पण जेव्हा त्याच ठिकाणी हा प्रकार रोज घडू लागल्यावर पीडित तरूणी समोर आल्या.
माध्यमांनीही या प्रकरणाची दखल घेतल्यावर पोलिसांनी आपली यंत्रणा कामाला लावली. आरोपीला आता पोलिसांनी पकडलं असून कठोरात कठोर शिक्षा द्यावी जेणेकरून असं करण्याचं धारिष्ट्य इतर कोणी करता कामा नये.
दरम्यान, या घटनेची गंभीर दखल आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी घेतली. वरिष्ठांनी तातडीने आरोपींना अटक करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक प्रवीण यादव यांना दिले.पोलीस उपनिरीक्षक मोरे,पो.ह. सुलाने, डोईफोडे इत्यादींनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
Video Player
00:00
00:00