
उत्तरप्रदेशच्या कानपूरमधून एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. येथे एका गृहस्थाच्या मृत्यूनंतर पोलीस थेट त्यांच्या अंत्यविधी पोहोचले आणि जळतं सरण विझवून मृतदेह ताब्यात घेतला.उत्तरप्रदेशच्या कानपूरमधून एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. येथे एका गृहस्थाच्या संशयास्पद मृत्यूनंतर पोलीस थेट त्यांच्या अंत्यविधी पोहोचले आणि जळतं सरण विझवून मृतदेह ताब्यात घेतला. घडले असे की, मृत व्यक्तीच्या पत्नीला हे खून प्रकरण असल्याचा संशय होता. याबद्दल तिने तातडीने पोलिसांनी कळवले. माहिती मिळताच पोलीस अंत्यविधी स्थळावर दाखल झाले होते.वृत्तानुसार, हे प्रकरण आहे कानपूरच्या चकेरी पोलीस ठाणे हद्दीतील. येथे राहणाऱ्या ३२ वर्षीय सोहनलाल द्विवेदी यांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला होता.
सोहन हे पेशाने इलेक्ट्रिकल मेकॅनिक होते, तर त्यांची पत्नी गृहिणी असून ते पत्नी आणि तीन मुलांसह वास्तव्यास होते. दरम्यान त्यांनी पत्नी आपल्या मुलांसह तिच्या माहेरी गेली होती. याचवेळी त्यांचा सोहनलाल यांचा मृत्यू झाला.९ एप्रिलला पत्नी नीलम यांना त्यांच्या पतीचे निधन झाल्याची बातमी समजली. त्यांना सांगण्यात आले की, सकाळी सोहन हे जेव्हा अंथरुणातून उठले तेव्हा त्यांचे धाकटे भाऊ मोहन यांना सोहन निपचित पडल्याचे दिसले. नंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
नंतर कुटुंबीयांनी तातडीने मृतदेह सिद्धनाथ घाटावर नेला आणि अंत्यविधी सुरु केली.जेव्हा नीलम यांनी मृतदेहाला निरखून पाहिले, तेव्हा त्यांना दिसले की सोहन यांच्या डोक्यावर जखमा आणि रक्ताचे डागही आहेत. हे पाहून सोहनचा मृत्यू सामान्य नसून खून आहे असा संशय नीलमना आला. नीलम यांनी भावासोबत जाऊन तातडीने याबद्दल पोलिसांना कळवले.पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी थेट घटनास्थळ गाठले. त्यानंतर अंत्यविधीच्या ठिकाणी जात सरणावर पाणी टाकून आग विझवली. तो मृतदेह ताब्यात शवविच्छेदनासाठी रवाना केला. अतिरिक्त डीसीपी पूर्व मनोज पांडे म्हणाले की, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.
Video Player
00:00
00:00