रणजित कासलेंचा EVM च्या छेडछाडीचा दावा, निवडणूक आयोगानं फेटाळला, केला महत्त्वाचा खुलासा.

महाराष्ट्र निवडणूक आयोगाने रणजित कासले यांचे दावे फेटाळले आहेत. रणजीत कासले यांनी निवडणुकीदरम्यान दहा लाख रुपये आपल्या अकाउंट वर जमा करण्यात आले असल्याचे दावा केला होता.महाराष्ट्र निवडणूक आयोगाने रणजित कासले यांचे दावे फेटाळले आहेत. रणजीत कासले यांनी निवडणुकीदरम्यान दहा लाख रुपये आपल्या अकाउंट वर जमा करण्यात आले असल्याचे दावा केला होता धनंजय मुंडे यांनी EVM च्या आसपास फिरकू नये यासाठी दहा लाख रुपये दिले असल्याचा आरोप रणजीत कासले यांनी केला होता. त्यातील 7.5 लाख रुपये रक्कम परत केली असल्याचेही त्यांनी सांगितले तर उर्वरित अडीच लाख रक्कम ही खर्च झाली असल्याचे सांगितले. रणजित कासले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलेल्या आरोपांवर निवडणूक आयोगाने खुलासा केला आहे.2024 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांना कोणत्याही प्रकारची निवडणूक ड्युटी लावण्यात आली नव्हती.

विधानसभा निवडणुकीदरम्यान त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा राबवण्यात आली होती.केंद्रीय दल, राज्य राखीव पोलिस आणि जिल्हा पोलिसांसह मजबूत त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणेने स्ट्राँग रूमच्या सुरक्षात दैनात होती.निवडणूक प्रक्रिया 24 तास सीसीटीव्हीच्या निरीक्षणात होती तसेच अधिक पारदर्शकता आणण्यासाठी राजकीय पक्षाचे पदाधिकारी देखील या ठिकाणी तैनात होते.हे दावे/आरोप बिनबुडाचे, निराधार, दिशाभूल करणारे आणि निवडणूक प्रक्रियेवर अवास्तव शंका निर्माण करण्याच्या उद्देशाने आहेत, बीड जिल्हाधिकारी आणि एसपी यांच्या अहवालांनी याची पुष्टी केली आहे.निवडणूक निष्पक्ष, शांततेत आणि पूर्णपणे सुरक्षित पद्धतीने पार पडली. काय म्हणाले होते कासले? माझ्या अकाऊंटला मतदानाच्या दिवशी 10 लाख रुपये आले. संत बाळुमामा कंपनीतून माझ्या अकाऊंटला 10 लाख रुपये पाठवण्यात आले. ही कंपनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडची ही कंपनी आहे. 7.5 लाख रुपये परत केले तर 2.5 लाख राहिले आहेत. तेही मी परत करणार आहे. ईव्हीएमला छेडछाड होईल त्यापासून दूर जायचे असे सांगितले. परळीला माझी ड्यूटी होती. अपुरे मनुष्यबळ असताना मला तिथे फिरकू दिले नाही. धनंजय मुंडे नाही तर पूर्ण सरकारच चुकीच्या पद्धतीने आल्याचा दावा कासले यांनी केला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.