गावकऱ्यांनी सांगितले की, लग्नाची मिरवणूक शनिवारी सकाळी भिलुडा गावातून येणार होती. लग्नाच्या मिरवणुकीचे स्वागत करण्यासाठी आणि खाण्यापिण्यासाठी मिठाई आणि इतर पदार्थ तयार केले जात होते. यासोबतच तंबू सजवण्यासह इतर व्यवस्थाही केल्या जात होत्या. गुरुवारी रात्री वधू नेहालाही घोड्यावर बसवून गावभर फिरवण्यात आले. पण आजच्या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. राजस्थानमधील डुंगरपूरमध्ये लग्नाच्या एक दिवस आधी वधूचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी(१८ एप्रिल) दुपारी २ वाजताच्या सुमारास लग्न घरापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या विहिरीत तीचा मृतदेह आढळला. गुरुवारी रात्री, वधूला घोड्यावर बसवून संपूर्ण गावात मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. नवरदेवाची वरात आज(१९ एप्रिल) येणार होती. पण त्यापूर्वीच वधूच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे.
वधूच्या मृत्यूने लग्न घरावर शोककळा पसरली आहे. ही घटना डुंगरपूरमधील शिवराजपूर गावात घडली आहे. मुलीच्या वडिलांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे. सरोदा Poilce Station चे एसएचओ म्हणाले शिवराजपूर येथील रहिवासी मोगजी प्रजापती यांचा मुलगा नारायणलाल यांनी ही तक्रार दिली आहे. त्यात म्हटले होते की त्यांची मुलगी नेहा प्रजापती (२१) हिचे लग्न १९ एप्रिल रोजी होणार होते. परंतु, शुक्रवारी दुपारी नेहाचा मृतदेह घरापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीत आढळला.










