पतीचा अंत झाला, पत्नीला मात्र वेगळाच संशय; पोलीस तडक अंत्यविधीस्थळी पोहोचले अन् चितेवर पाणी ओतून पुढे जे केले…

उत्तरप्रदेशच्या कानपूरमधून एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. येथे एका गृहस्थाच्या मृत्यूनंतर पोलीस थेट त्यांच्या अंत्यविधी पोहोचले आणि जळतं सरण विझवून मृतदेह ताब्यात घेतला.उत्तरप्रदेशच्या  कानपूरमधून एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. येथे एका गृहस्थाच्या संशयास्पद मृत्यूनंतर  पोलीस थेट त्यांच्या अंत्यविधी पोहोचले आणि जळतं सरण विझवून मृतदेह ताब्यात घेतला. घडले असे की, मृत व्यक्तीच्या पत्नीला हे खून प्रकरण असल्याचा संशय होता. याबद्दल तिने तातडीने पोलिसांनी कळवले. माहिती मिळताच पोलीस अंत्यविधी स्थळावर दाखल झाले होते.वृत्तानुसार, हे प्रकरण आहे कानपूरच्या चकेरी पोलीस ठाणे हद्दीतील. येथे राहणाऱ्या ३२ वर्षीय सोहनलाल द्विवेदी यांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला होता.

सोहन हे पेशाने इलेक्ट्रिकल मेकॅनिक होते, तर त्यांची पत्नी गृहिणी असून ते पत्नी आणि तीन मुलांसह वास्तव्यास होते. दरम्यान त्यांनी पत्नी आपल्या मुलांसह तिच्या माहेरी गेली होती. याचवेळी त्यांचा सोहनलाल यांचा मृत्यू झाला.९ एप्रिलला पत्नी नीलम यांना त्यांच्या पतीचे निधन झाल्याची बातमी समजली. त्यांना सांगण्यात आले की, सकाळी सोहन हे जेव्हा अंथरुणातून उठले तेव्हा त्यांचे धाकटे भाऊ मोहन यांना सोहन निपचित पडल्याचे दिसले. नंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

नंतर कुटुंबीयांनी तातडीने मृतदेह सिद्धनाथ घाटावर नेला आणि अंत्यविधी सुरु केली.जेव्हा नीलम यांनी मृतदेहाला निरखून पाहिले, तेव्हा त्यांना दिसले की सोहन यांच्या डोक्यावर जखमा आणि रक्ताचे डागही आहेत. हे पाहून सोहनचा मृत्यू सामान्य नसून खून आहे असा संशय नीलमना आला. नीलम यांनी भावासोबत जाऊन तातडीने याबद्दल पोलिसांना कळवले.पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी थेट घटनास्थळ गाठले. त्यानंतर अंत्यविधीच्या ठिकाणी जात सरणावर पाणी टाकून आग विझवली. तो मृतदेह ताब्यात शवविच्छेदनासाठी रवाना केला. अतिरिक्त डीसीपी पूर्व मनोज पांडे म्हणाले की, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.

  • Related Posts

    आगीची धग पाच गावांना; नाशिकच्या ‘जिंदाल’मध्ये अग्नितांडव सुरुच, निम्मा प्रकल्प खाक.

    आगीत कंपनीतील १६ पैकी आठ प्रकल्प खाक झाले, तर नव्वद टक्के उत्पादन विभाग भक्ष्यस्थानी पडला आहे. प्रशासनाने तीन किमी परिसरासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले असून, एक किमी परिसरातील पाच गावे…

    अखेर वैष्णवीच्या दीर-सासऱ्याला अटक, रुपाली चाकणकरांचा मोठा इशारा, म्हणाल्या – ही विकृती…

     बावधन पोलिसांनी वैष्णवी हगवणेच्या सासरा आणि दीराला अटक केली आहे. त्यांना पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी वैष्णवीचा पती, सासू आणि ननंद यांना पोलिसांनी आधीच अटक केली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    आगीची धग पाच गावांना; नाशिकच्या ‘जिंदाल’मध्ये अग्नितांडव सुरुच, निम्मा प्रकल्प खाक.

    आगीची धग पाच गावांना; नाशिकच्या ‘जिंदाल’मध्ये अग्नितांडव सुरुच, निम्मा प्रकल्प खाक.

    अखेर वैष्णवीच्या दीर-सासऱ्याला अटक, रुपाली चाकणकरांचा मोठा इशारा, म्हणाल्या – ही विकृती…

    अखेर वैष्णवीच्या दीर-सासऱ्याला अटक, रुपाली चाकणकरांचा मोठा इशारा, म्हणाल्या – ही विकृती…

    निवडणुकांचे रणकंदन: नव्या राजकारणाची चाहूल.

    निवडणुकांचे रणकंदन: नव्या राजकारणाची चाहूल.

    चंद्रपूर हादरलं! वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, वाचविण्यासाठी धावलेला पुतण्याही जखमी, १३ दिवसांत ९ घटना.

    चंद्रपूर हादरलं! वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, वाचविण्यासाठी धावलेला पुतण्याही जखमी, १३ दिवसांत ९ घटना.