शिव पानंदचे आंदोलन महसुलमंत्र्यांच्या आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित- शरद पवळे/ दादासाहेब जंगले मा. मंत्री महसुल यांच्या कार्यालयामध्ये दि.२४ एप्रिलला बैठक.

महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने शेतरस्त्यांच्या प्रश्नांवर आझाद मैदानावर दि.२१,२२ एप्रिलला राज्यभरातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या धरणे व जलत्याग आंदोलनाची मा. महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयामध्ये शिव पानंद चळवळीच्या शेतरस्त्यांच्या प्रश्नावरील मांगण्याच्या संदर्भात प्रमुख पदाधिकाऱ्यांची दि.२४ एप्रिलला बैठक आयोजित करण्यात आली असुन यांसदर्भात महसुलचा स्वतंत्र शासन निर्णय बनवण्यासंदर्भात चळवळीच्या वतीने सरकारला सकारात्मक प्रतिसाद देत आझाद मैदनावरील राज्यव्यापी आंदोलन तात्पुरते स्थगित करून सरकारशी चर्चा करून आपल्या मागण्या शासननिर्णयात घेण्यासाठी आम्ही आग्रही राहू शेवटच्या शेतकऱ्याला दर्जेदार शेतरस्ता मिळून देण्यासाठी आग्रही राहून शिव पानंद शेतरस्ते, गाडीमार्ग, पायमार्ग, वहिवाटीचे रस्ते आदी नकाशावरील शेतरस्त्यांसह तहसिल प्रांत कार्यालयातील प्रलंबित शेतरस्ता केसेस यासंदर्भात विशेष कालावधी मुदत जाहीर करून शेतरस्त्यांच्या हद्द निश्चिती, नकाशावर लांबी रुंदी, दगड नंबरी, शेतरस्ता नंबरींग , ग्रामशेतरस्ता समिती स्थापना,यांसह मोजणी शुल्क संरक्षण फी संदर्भात विशेष निर्णय आदी मागण्या शासनिर्णयात घेण्यात चळवळ आग्रही राहील तरी राज्यभरातीत तमाम शेतकरी बांधव, वृत्त पत्र इले.

मिडीयातील पत्रकार बांधवांनी दिलेल्या पाठबळामुळे आज सरकारने सकारात्मक भुमिका घेतली असुन महसुलचे मुख्य सचिव प्रविण महाजन, विशेष कार्य अधिकारी सचिन ढोले,महसुचे राहूल गांगुर्डे यांनी शेतकऱ्यांची भावना व पिढ्यान पिढ्या चाललेला संघर्ष पाहून शिव पानंद शेतरस्ता चळवळीला प्रतिसाद देवून दुरध्तनीवरून संपर्क साधत मा. महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी न्यायाची भुमिका घेत तातडीने पत्र देत मुंबई येथिल महसुल कार्यालयामध्ये महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांच्या उपस्थित अधिकाऱ्यांची बैठीक घेवून परिपूर्ण शासन निर्णय बनवून शेतकऱ्यांना सरकार दर्जेदार शेतरस्ते देण्यासाठी बांधील राहील असे आश्वासन दिले.

चौकट-या आंदोलनामागे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत – शेतीच्या सीमांवर असणारे अडथळे, बंद रस्ते, न्यायालयात अडकलेली प्रकरणे आणि सरकारी दुर्लक्ष. या पार्श्वभूमीवर आंदोलनाची गरज होती. मात्र गोरगरीब शेतकऱ्यांनी उन्हाच्या तडाख्यात उपोषणाला बसू नये, या महसूल मंत्री बावनकुळे साहेबांच्या संवेदनशील विचाराने चळवळीचे प्रणेते शरदराव पवळे आणि समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी कानिफनाथ मंदिर जंगलेवाडी श्रीगोंदा येथे तातडीने बैठक घेऊन आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. यावेळी शिरूर व श्रीगोंदा चळवळ कृती समिती सदस्य सुरेश वाळके साहेब व बापुराव जंगले पाटील उपस्थित होते.पाणंद रस्ते याबाबत दि. २१ एप्रिल, २०२५ रोजी आपण आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन करणार अशी घोषित केले आहे. त्यासंदर्भात आपणास कळविण्यात येत आहे की, सदर विषयाच्या अनुषंगाने मा. मंत्री, महसूल यांच्या कार्यालयामध्ये दि. २४.०४.२०२५ रोजी सायं. ५ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे.तरी, आपले नियोजित आंदोलन स्थगित करुन पाणंद रस्ते व इतर अनुषांगिक बाबींबाबत आपल्या सूचना मांडण्यासाठी सदर बैठकीस मा. मंत्री, महसूल यांच्या कार्यालयात उपस्थित रहावे, अशी आपणास विनंती.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.