‘ते फक्त कोकणात मासे-मटण खाण्यासाठीच…’ नारायण राणेंचा ठाकरेंना उपरोधिक टोला; विकासनिधीवरुनही घेरले.

महाराष्ट्राच्या राजकारणात नारायण राणे आणि उद्धव ठाकरे हा संघर्ष जुना आहे. उद्धव ठाकरे यांच्या आगामी काळातील कोकण दौऱ्यावरून भाजपचे ज्येष्ठ नेते तथा खासदार नारायण राणे यांनी आज पुन्हा उद्धव ठाकरेंवर तोफ डागली आहे.महाराष्ट्राच्या राजकारणात नारायण राणे आणि उद्धव ठाकरे हा संघर्ष जुना आहे. उद्धव ठाकरे यांच्या आगामी काळातील कोकण दौऱ्यावरून भाजपचे ज्येष्ठ नेते तथा खासदार नारायण राणे यांनी आज पुन्हा उद्धव ठाकरेंवर तोफ डागली आहे. ‘कोकणात उद्धव ठाकरे येतो, ते फक्त मासे मटण वडे खाण्याकरताच येतो, म्हणून मी येथील व्यवसायिकांना सांगितलं आहे. त्या दिवशी मटण वडे, मासे बंद ठेवा’ अशी उपरोधिक टीका नारायण राणे यांनी ठाकरेंवर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या डीपीडीसीच्या बैठकीला आज खासदार नारायण राणे उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

नारायण राणे म्हणाले, ‘उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना मिळालेल्या पैशांची आकडेवारी जरा मागवा. तो कोकणात येणारही नाही, नाहीतर मी तुम्हाला आकडेवारी देईन. त्याने किती पैसे सिंधुदुर्गला दिले? असाही खडा सवाल राणे यांनी उपस्थित केला आहे. मग कळेल काय अधिकार आहे त्यांना कोकणावर बोलायचा. म्हणून मी हॉटेलवाल्यांना सांगितलं की, कोंबडी वडे आणि मासे बंद करा. ज्या दिवशी तो येईल त्या दिवशी दुसरं काही करत नाही तेवढेच खायला तो येतो.चिपी विमानतळावरून आता सेवा पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाली आहे, यावर राणे माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, आता इंडिगो पण येणार सगळे येणार आता ते कधी बंद होणार नाही.

देशात सगळीकडे विमान जातील येतील, यासाठी माझे प्रयत्न आहेत. पण लोकांनी प्रवास करावा आणि त्यासाठी उत्पन्न वाढावं, यासाठी माझे प्रयत्न आहेत. कोकणातील माणसांनी उद्योगधंदे करावेत हा प्रयत्न आम्ही करत आहोत, असेही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.नारायण राणे यांच्या या विधानानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. या दौऱ्याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिलं आहे. राणे यांनी केलेल्या टीकेनंतर आता उद्धव ठाकरे यांच्याकडून कोणती प्रतिक्रिया येते, हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे.

  • Related Posts

    साताऱ्यात चहा घेतला अन् काही मिनिटातच होत्याचं नव्हतं! देवदर्शनाला जाण्याआधी बिरोबा मंदिरासमोर काळाचा घाला.

    इचलकरंजी येथील ही खासगी प्रवासी बस ही भाविक महिलांना घेऊन उज्जैन येथे देवदर्शनास निघाली होती. ही बस वाठार स्टेशनमार्गे सालपे घाट उतरून लोणंदकडे शनिवारी मध्यरात्री जात होती.महिलांना घेऊन देवदर्शनासाठी उज्जैनला…

    मध्यरात्रीचा थरार! लेकीच्या घरी आलेल्या बापाला जावयाने निर्घृणपणे संपवलं, क्षुल्लक कारणाने थेट डोक्यात…

     सकाळी ६ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. जखमी जनार्दन यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शनिवारी त्यांचा मृत्यू झाला.पैशाच्या वादातून जावयाने वरवंट्याने डोके ठेचून झोपेत असलेल्या सासऱ्याची हत्या केली.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    साताऱ्यात चहा घेतला अन् काही मिनिटातच होत्याचं नव्हतं! देवदर्शनाला जाण्याआधी बिरोबा मंदिरासमोर काळाचा घाला.

    साताऱ्यात चहा घेतला अन् काही मिनिटातच होत्याचं नव्हतं! देवदर्शनाला जाण्याआधी बिरोबा मंदिरासमोर काळाचा घाला.

    मध्यरात्रीचा थरार! लेकीच्या घरी आलेल्या बापाला जावयाने निर्घृणपणे संपवलं, क्षुल्लक कारणाने थेट डोक्यात…

    मध्यरात्रीचा थरार! लेकीच्या घरी आलेल्या बापाला जावयाने निर्घृणपणे संपवलं, क्षुल्लक कारणाने थेट डोक्यात…

    ब्रिटिशांपासून लपवलेली शस्त्रं दशकांनी सापडली, महाबळेश्वरच्या विहिरीत ‘इतिहास’ गवसला, शिवकालीन ठेव्याशी साधर्म्य.

    ब्रिटिशांपासून लपवलेली शस्त्रं दशकांनी सापडली, महाबळेश्वरच्या विहिरीत ‘इतिहास’ गवसला, शिवकालीन ठेव्याशी साधर्म्य.

    भाच्याला भेटायला जाताना टँकरने चिरडलं, पुण्यातील प्रसिद्ध तबला वादकाचा दुर्दैवी मृत्यू.

    भाच्याला भेटायला जाताना टँकरने चिरडलं, पुण्यातील प्रसिद्ध तबला वादकाचा दुर्दैवी मृत्यू.