
पक्ष संघटनेत नाराजी होत असते, तिकीट एक असते, अनेकांना द्यायचे असते, असं उत्तरही त्यांनी शिवडी विधानसभा निवडणुकीवेळी झालेल्या नाराजीनाट्याच्या प्रश्नावर दिलं. सुप्रसिद्ध ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे. ठाकरेंनी दिलेली जबाबदारी अतिशय मोठी आहे, आपण ती प्रामाणिकपणे पार पाडू, असा विश्वास सुधीर साळवींनी पहिली प्रतिक्रिया देताना व्यक्त केला. पक्ष संघटनेत नाराजी होत असते, तिकीट एक असते, अनेकांना द्यायचे असते, असं उत्तरही त्यांनी शिवडी विधानसभा निवडणुकीवेळी झालेल्या नाराजीनाट्याच्या प्रश्नावर दिलं.अतिशय आनंद होत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माझे मार्गदर्शक आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यासाठी माझी सचिव पदी नियुक्ती झाल्याचा अतिशय आनंद आहे.
मी अनेक वर्ष शिवसेनेत काम करतोय, यापुढेही त्यांच्या आदेशाने, नित्यनेमाने आणि प्रामाणिकपणे काम करत राहीन, अशी ग्वाही सुधीर साळवींनी दिली.मी शिवडी विधानसभा संघटक म्हणून काम केलंय, लोकसभा समन्वयक म्हणून अरविंद सावंत यांच्यासाठी काम केलं आहे. उद्धव आणि आदित्य ठाकरेंच्या मार्गदर्शनात काम करत राहणार, असं साळवी म्हणाले.शिवडी विधानसभा निवडणुकीवेळी तिकीट न मिळाल्यावरुन प्रश्न विचारला असता, सुधीर साळवी म्हणाले की पक्ष संघटना असते, नाराजी होत असते, तिकीट एक असतं, पण अनेकांना द्यायचं असतं. आजही आमदार अजय चौधरींचा मला फोन आला, त्यांनी माझं अभिनंदन केलं. आम्ही अनेक निवडणुका एकत्र लढलो आहोत.
पक्षांतर्गत काही मतभेद असतात, पण आम्ही एकत्र काम करतोय. पक्षाने दिलेली जबाबदारी अजय चौधरी, दगडू सकपाळ, अरविंद सावंत यांच्या मार्गदर्शनात काम करुन पार पाडेन, असा विश्वास साळवींनी बोलून दाखवला.आव्हान सर्वच निवडणुकीत असतं. जेव्हा मुंबई महापालिका निवडणुका येतील, त्यावेळी उद्धव ठाकरे जो आदेश देतील, त्यानुसार पुढील वाटचाल करु. मी अनेक वर्ष लालबाग शिवडी परळमध्ये काम करतोय. इथलं संघटन मोठं आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून हा बालेकिल्ला राहिला आहे. शिवसैनिकांचं प्राबल्य आहे. आव्हान कितीही मोठं असलं तरी पेलून नेऊ शकतो, हा विश्वास असल्याचं सुधीर साळवी म्हणाले.लालबागचा राजाचे आशीर्वाद सदोदित माझ्या पाठीशी आहेत. कुठलंही पद मिळेल, मी प्रामाणिकपणे काम करत राहीन. उद्धव ठाकरेंनी दिलेली जबाबदारी, अतिशय मोठी समजतो, प्रामाणिकपणे पार पाडेन, असंही साळवी म्हणाले.
Video Player
00:00
00:00