
उत्तर प्रदेशमधील अलीगढच्या मंद्रक पोलीस स्टेशन परिसरातील मनोहरपूरमधील हे प्रकरण सध्या खूप चर्चेत आहे. फिर्यादी जितेंद्र कुमार यांच्या मुलीचे लग्न छर्रा परिसरातील राहुलशी ठरले होते. लग्नाच्या पत्रिकाही वाटल्या गेल्या. पण लग्नाच्या नऊ दिवस आधी, नवरा मुलगा त्याच्या होणाऱ्या सासूसोबत पळून गेला. ही बातमी समजताच वधूच्या कुटुंबाला जबर धक्का बसला.उत्तर प्रदेशमधील अलीगढहून जावयासह पळून गेलेल्या सासूचा उत्तराखंडमधील रुद्रपूरमध्ये ठावठिकाणा लागला होता. परंतु, यूपी पोलिस तिथे पोहोचण्याआधीच दोघांनीही तिथून पळ काढला आणि आपले स्थान बदलले. दुसरीकडे, महिलेचा पती आणि तिच्या मुलीने स्वतःला लाजेखातर घरातच कोंडून घेतले आहे. ते कोणाशीही बोलत नाहीयेत. “देव अशी आई कोणालाही देऊ नये” असे मुलीचे म्हणणे आहे. उत्तर प्रदेशमधील अलीगढच्या मंद्रक पोलीस स्टेशन परिसरातील मनोहरपूरमधील हे प्रकरण सध्या खूप चर्चेत आहे. फिर्यादी जितेंद्र कुमार यांच्या मुलीचे लग्न छर्रा परिसरातील राहुलशी ठरले होते. लग्नाच्या पत्रिकाही वाटल्या गेल्या. पण लग्नाच्या नऊ दिवस आधी, नवरा मुलगा त्याच्या होणाऱ्या सासूसोबत पळून गेला.
ही बातमी समजताच वधूच्या कुटुंबाला जबर धक्का बसला.वधूच्या वडिलांनी पत्नी आणि नवऱ्यामुलाविरोधात तक्रार दाखल केली. “माझ्या मुलीचे लग्न १६ एप्रिल रोजी होणार होते. मी तिच्यासाठी हुंड्याच्या वस्तूंची जमवा-जमव केली होती. मी घरी ५ लाख रुपयांचे दागिने आणि ३ लाख रुपयांची रोकड ठेवली होती जेणेकरून मी माझ्या मुलीला तिच्या जाण्याच्या वेळी ते देऊ शकेन. पण मी घरी आल्यावर माझ्या पत्नीने असे काही केले की मला अजूनही विश्वास बसत नाही” असे मुलीच्या वडिलांचे म्हणणे आहे.ते पुढे म्हणाले की, “मी राहुलला(नवरा मुलगा,ज्याच्यासोबत सासू पळून गेली) फोन केला. सुरुवातीला त्याने नकार दिला आणि म्हटले की माझी पत्नी त्याच्यासोबत नाही. पण नंतर त्याने ते मान्य केले आणि मला शिवीगाळ करायला सुरुवात केली की, तू तुझ्या पत्नीसोबत २० वर्षांपासून राहत आहेस.
तू तीला खूप त्रास दिला आहेस. आता तीला विसरून जा. ती माझी आहे”.दरम्यान वधू शिवानी आणि तिचे वडील जितेंद्र यांनी असे म्हटले की सासू आणि जावई दोघेही कुठेही आणि कसेही राहू शकतात. आमच्यासाठी ते मेले आहे. आम्हाला फक्त त्या महिलेने घरातून चोरुन नेलेल्या सर्व वस्तू परत हव्या आहेत.दुसरीकडे, यूपी पोलिसांना सासू-जावयाचे ठिकाण माहित होते परंतु ते कुठे लपले आहेत हे अद्याप त्यांना कळू शकलेले नाही. आता पुन्हा एकदा त्याचे लोकेशन शोधले जात आहे. खरंतर, राहुल पूर्वी रुद्रपूरमध्ये काम करायचा. दोघेही रुद्रपूरला पळून गेले असल्याची शंका आहे. दरम्यान, वधू आणि तिचे वडील आता कोणाशीही बोलत नसून. त्यांनी स्वतःला घरात कैद करून घेतले आहे.
Video Player
00:00
00:00