नागपूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, चौघांचा मृत्यू, ११ जखमी; १५० कर्मचारी थोडक्यात बचावले.

नागपुरातील उमरेड येथील एमआयडीसीमध्ये आगीची घटना घडली आहे. एका कंपनीत स्फोट होऊन मोठी आग लागली. या आगीत चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील औद्योगिक वसाहतीत भीषण आग लागली. औद्योगिक वसाहतीमधील MMP इंडस्ट्रीज लिमिटेड या ॲल्युमिनियम फॉइल आणि पावडर निर्मिती करणाऱ्या कंपनीत शुक्रवारी दुपारी भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे कंपनीत मोठ्या प्रमाणावर आग लागली असून चार कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर एक कामगार अद्याप बेपत्ता आहे. या दुर्घटनेत ११ कामगार गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर नागपूरच्या विविध शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.एमआयडीसीमधील कंपनीतील स्फोट इतका तीव्र होता की काही सेकंदांतच कंपनीच्या संपूर्ण परिसरात आग भडकली. ॲल्युमिनियम फॉइल तयार करताना वापरली जाणारी ज्वलनशील रसायने आणि उच्च तापमानामुळे आगीने भयंकर रूप धारण केले.

स्फोटाच्या वेळी सायंकाळच्या शिफ्टमध्ये अंदाजे १५० कामगार कार्यरत होते. अनेक कामगारांनी प्रसंगावधान राखून जीव वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र काहीजण आगीच्या गर्तेत अडकले.आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. सायंकाळी सहाच्या सुमारास लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. रात्री उशिरा जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर आणि पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि बचावकार्यास गती देण्यात आली.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी काही काळ सुरक्षित अंतर राखण्याचे निर्देश प्रशासनाने दिले होते.

स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी यंत्रसामुग्रीतील बिघाड, वीजपुरवठ्यातील अडचण किंवा रसायनांच्या चुकीच्या हाताळणीची शक्यता वर्तवली जात आहे.माजी आमदार राजू पारवे यांनी कंपनीच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप करत सांगितले की, “दोन महिन्यांपूर्वी कामगारांनी सुरक्षाव्यवस्थेबाबत तक्रारी करत संप केला होता. नुकतेच २५ अनुभवी कामगारांना कामावरून कमी करून नवख्या कामगारांची भरती करण्यात आली. हाच हलगर्जीपणा दुर्घटनेचे कारण असू शकते.” दरम्यान, स्थानिक पोलीस, औद्योगिक सुरक्षा यंत्रणा आणि अन्य तपास संस्थांनी घटनास्थळी तपास सुरू केला आहे. मृतांच्या कुटुंबियांना मदतीचे संकेत देण्यात आले असून, औद्योगिक सुरक्षेबाबत नव्याने कठोर धोरणांची गरज अधोरेखित झाली आहे.

  • Related Posts

    जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटक लक्ष्य, ६ जखमी; लष्कराकडून सर्च ऑपरेशन.

    जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात सहा पर्यटक जखमी झाले आहेत. पहलगाम परिसरात पर्यटकांची कायम गर्दी असते. दरवर्षी लाखो पर्यटक या भागाला भेट देतात.श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा…

    लग्न ठरलेल्या मुलीने बॉयफ्रेंडच्या घरात संपवलं जीवन? कुटुंबियांचा गंभीर आरोप.

     जालना जिल्ह्यातील फत्तेपूर येथे एका १८ वर्षीय अविवाहित तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल आघाम या तरुणाने लग्नाची धमकी दिल्याने तिने त्याच्या घरी आत्महत्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटक लक्ष्य, ६ जखमी; लष्कराकडून सर्च ऑपरेशन.

    जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटक लक्ष्य, ६ जखमी; लष्कराकडून सर्च ऑपरेशन.

    लग्न ठरलेल्या मुलीने बॉयफ्रेंडच्या घरात संपवलं जीवन? कुटुंबियांचा गंभीर आरोप.

    लग्न ठरलेल्या मुलीने बॉयफ्रेंडच्या घरात संपवलं जीवन? कुटुंबियांचा गंभीर आरोप.

    अँटिलिया वक्फची संपत्ती? मुकेश अंबानींवर जमीन हडपल्याचे आरोप; या व्यक्तीने बनवलेले अनाथाश्रम.

    अँटिलिया वक्फची संपत्ती? मुकेश अंबानींवर जमीन हडपल्याचे आरोप; या व्यक्तीने बनवलेले अनाथाश्रम.

    दोन दुचाकीची जबर धडक : महिला जखमी !

    दोन दुचाकीची जबर धडक : महिला जखमी !