देवदर्शन करुन घरी येताना कुटुंबावर काळाचा घाला, समृद्धी महामार्गावर कारचा चुराडा; पिता-पुत्राचा जागीच मृत्यू.

बुलढाण्यातील कुटुंब देवदर्शन करुन घराकडे परत येताना कारला भीषण अपघात झाला. या अपघातात वडील आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर इतर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.देवदर्शन करून घराकडे परत निघालेल्या वाशीम येथील चंदनशिव कुटुंबावर काळाने घाला घातला. समृद्धी महामार्गावर भरधाव कार समोरील ट्रकवर मागून धडकल्याने झालेल्या अपघातात पिता-पुत्र ठार झाले. तर पत्नी, सून, मुलीसह चालक असे चार जण गंभीर जखमी झाले. मेहकर तालुक्यात चॅनेल क्रमांक २६८.६०० जवळ शुक्रवारी पहाटे तीन वाजता ही दुर्घटना घडली. वडील रतन चंदनशिव आणि मुलगा गोपाल चंदनशिव अशी मृतांची नावे आहेत. तर रतन यांची पत्नी अर्चना चंदनशिव, मुलगा पूजा चंदनशिव, सून राणी गोपाल चंदनशिव आणि चालक शिवाजी इडोळे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत.वडील रतन चंदनशिव (५५) आणि मुलगा गोपाल चंदनशिव (३५) अशी मृतांची नावे आहेत. तर रतन यांची पत्नी अर्चना चंदनशिव

(६८), मुलगा पूजा रतन चंदनशिव (२९), सून राणी गोपाल चंदनशिव (३१) व चालक शिवाजी इडोळे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत.वाशीमचा चंदनशिव परिवार देवदर्शनासाठी गेला होता. गुरुवारी रात्रीच हे कुटुंब वाशीमला परत निघाले होते. मेहकर तालुक्यातून जात असताना समृद्धी महामार्गावर त्यांच्या कारला पहाटे तीन वाजता अपघात झाला. महामार्ग व डोणगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना तत्काळ रुग्णवाहिकेद्वारे संभाजीनगरला हलविले. क्रेनच्या साहाय्याने वाहतूक सुरळीत करण्यात आली.अमरावती-बडनेरा मार्गावर जुन्या वस्तीतील सजनाजीबुवा हनुमान मंदिराजवळ एसटी महामंडळाच्या बसने दुचाकीला जबर धडक दिली.

यात सात वर्षांच्या बालकाचा मागील चाकात येऊन जागीच मृत्यू झाला, तर आई जखमी झाली. हा अपघात शुक्रवारी दुपारी घडला. रुद्र मंगेश घिडाणी (७) रा. बडनेरा असे मृत बालकाचे नाव आहे.तो अमरावती-बडनेरा मार्गावरील एका शाळेत पहिल्या वर्गामध्ये शिकत होता. नेहमीप्रमाणे त्याच्या आईने त्याला शाळेत सोडून देण्यासाठी दुचाकीवर घेतले. मार्गातील सजनाजी बुवा हनुमान मंदिराजवळ अचानक बसने दुचाकीला जबर धडक दिली. चालक दिगंबर मंगल कनाके (४१) रा. शेखबराज (जि. चंद्रपूर) याला बडनेरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.