सुधीर साळवी यांच्यावर मोठी जबाबदारी, उद्धव ठाकरेंची राजकीय खेळी, BMC च्या तोंडावर फेरबदल.

उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सुधीर साळवी यांच्यावर पक्षाच्या सचिव पदाचीही जबाबदारी सोपवण्यात आली. नियुक्तीचं पत्र काल प्रसिद्ध करण्यात आलं आहे.मुंबईतील सुप्रसिद्ध ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांना गणपती बाप्पा पावल्याचं दिसत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी साळवींवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. ठाकरे गटाचे सचिव म्हणून सुधीर साळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.लालबाग हा ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जातो. अशातच मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सुधीर साळवी यांच्याकडे पक्षाचे सचिवपद देऊन उद्धव ठाकरे यांनी मोठी राजकीय खेळी केल्याची चर्चा आहे.सुधीर साळवी हे सुप्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव आहेत. गेली २० वर्ष ते ही धुरा सांभाळत आहेत. त्यासोबतच महर्षी दयानंद कॉलेज आणि ग्लेनईगल्स हॉस्पिटलचे विश्वस्त म्हणून सुधीर साळवी कार्यभार सांभाळतात.

आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सुधीर साळवी यांच्यावर पक्षाच्या सचिव पदाचीही जबाबदारी सोपवण्यात आली. नियुक्तीचं पत्र काल प्रसिद्ध करण्यात आलं आहे.सुधीर साळवी यांच्यावर आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत नियोजनाचा जबाबदारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत सुधीर साळवी यांनी केलेल्या कामाची दखल ‘मातोश्री’ने घेतल्याची चर्चा ठाकरे गटात रंगली आहे.गणेशोत्सव काळात राष्ट्रीय स्तरावरील मोठमोठ्या नेत्यांपासून बॉलिवूड कलाकार, श्रीमंत उद्योगपती हे लालबागचा राजाच्या दर्शनाला येत असतात.

यावेळी सुधीर साळवी सर्वांचे आदरातिथ्य करताना पाहायला मिळतात. त्यामुळे साहजिकच सुधीर साळवी यांच्या नावाभोवती एक मोठं वलय निर्माण झालं आहे.सुधीर साळवींनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी ठाकरे गटाकडून शिवडी मतदारसंघातून लढण्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र ठाकरेंनी विद्यमान आमदार अजय चौधरी यांच्या बाजूने कौल दिल्याने साळवी नाराज झाल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर साळवी वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा होती, परंतु उद्धव ठाकरे यांनी समजूत घातल्यानंतर त्यांनी निष्ठेने ठाकरे गटात राहणंच पसंत केलं.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.