
बडोद्याच्या इंडियन पेट्रोकेमिकल्समधून सेवानिवृत्त झालेल्या प्रकाश अदी यांनी वयाच्या ८० व्या वर्षी देशातल्या अनेक मॅरेथॉन पूर्ण केल्या आहेत. सप्तशृंगगडावरील देवीच्या दर्शनासाठी ते थेट बडोद्याहून धावत नाशिकला आले आहेत. बडोद्याच्या इंडियन पेट्रोकेमिकल्समधून सेवानिवृत्त झालेल्या प्रकाश अदी यांनी वयाच्या ८० व्या वर्षी देशातल्या अनेक मॅरेथॉन पूर्ण केल्या आहेत. सप्तशृंगगडावरील देवीच्या दर्शनासाठी ते थेट बडोद्याहून धावत नाशिकला आले आहेत. नाशिकच्या नसती उठाठेव मंडळामध्ये शुक्रवारी (दि.११) त्यांचा सत्कार करण्यात आला. आज (दि. १२) सकाळी ते धावत जाऊन गडावर देवीचे दर्शन घेणार आहेत.प्रकाश अदी यांचे शिक्षण पुण्याच्या मॉर्डन शाळेत झाले. वडिलांच्या व्यवसायानिमित्त त्यांचे कुटुंब गुजरातमध्ये स्थायिक झाले. लहानपणापासून खेळाची आवड असल्याने त्यांनी फुटबॉल, बास्केटबॉल यासारख्या खेळांत उत्कृष्ठ कामगिरी केली. तसेच बास्केटबॉलचे आंतरराष्ट्रीय पंच म्हणून देखील काम पाहिले आहे. त्याचबरोबर त्यांनी ॲथेलेटीक्स खेळात विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे.
सुरुवातीला ५ किमी त्यांनतर १०, १५,२१, ४२ किमी स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन पदके मिळविली आहेत. देशाच्या विविध भागांत होत असलेल्या अनेक मॅरेथॉनमध्ये ते सहभागी होतात. आतापर्यंत त्यांनी पुणे, मुंबई, बडोदा, भोपाळ, दिल्ली अशा अनेक मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला आहे. सिंहगड ते तोरणा ही शंभर किमीची मॅरेथॉन पूर्ण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. मात्र, सोबत कुणी नसल्याने त्यांना ७५ किमीनंतर स्पर्धा सोडून द्यावी लागली.बडोदा येथे झालेल्या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतल्यानंतर एका गतीरोधकावरून पडल्यानंतर त्यांच्या नाकाला दुखापत झाली होती. वैद्यकीय पथकाने स्पर्धा सोडून देण्याचा सल्ला दिला.
मात्र, त्यांचा सल्ला न मानता त्यांनी ही स्पर्धा वेळेत पूर्ण केली. या खेळाबरोबरच ते जलतरणाचा देखील सराव करतात. पहाटे ४ वाजता त्यांचा दिवस सुरू होतो.सकाळी सात वाजेपर्यंत पळणे त्यानंतर विविध शारीरिक हालचाली करीत दहा वाजता त्यांचा व्यायम संपतो. ते केवळ शाकाहारी जेवण घेतात. त्याचबरोबर सकाळ-सायंकाळ गायीचे दूध घेतात. यासह कार्बोहायड्रेड आहार घेण्याला ते जास्त प्राधान्य देतात. येत्या काही दिवसात बोस्टन व न्यूयॉर्क येथे होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होण्याचा त्यांचा मानस आहे.
Video Player
00:00
00:00