
रेनबो नावाने सुरू असलेल्या या जलतरण तलावात विवेक आणि सूरज हे अन्य चार मित्रांसोबत सायंकाळी पोहण्यासाठी गेले. मात्र दोघांचाही बुडून मृत्यू झालामित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या बीएएमएसच्या दोन विद्यार्थ्यांचा चिखलीतील जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
विवेक अरुण वायले (वय २२) रा. पाथर्डी (अकोला) व सूरज सुनील पानखडे (वय २२) रा. गेवराई (बीड) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही चिखली येथील सुनील रामसिंह चुनावाले आयुर्वेदिक महाविद्यालयात बीएएमएसच्या द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होते.चिखलीतील तालुका क्रीडा संकुलचा जलतरण तलाव एकाने भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी घेतला आहे. रेनबो नावाने सुरू असलेल्या या जलतरण तलावात विवेक आणि सूरज हे अन्य चार मित्रांसोबत सायंकाळी पोहण्यासाठी गेले. मात्र दोघांचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना नेमकी कशी घडली, याबाबत माहिती समजू शकली नाही.
चिखली पोलिस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.दुसरीकडे, श्रीनगरहून दिल्लीला विमान घेऊन आलेल्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या वैमानिकाचे दिल्लीमध्ये अचानक निधन झाले. दिल्लीत विमान उतरवल्यानंतर या वैमानिकाची तब्येत बिघडली. त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तेथे त्याचे निधन झाले.‘प्रकृती अस्वास्थ्यामुळे एक सहकारी आम्हाला सोडून गेल्याचे आम्हाला मनापासून दुःख आहे. या कठीण प्रसंगाला तोंड देत असताना आम्ही त्यांना संपूर्ण सहकार्य करीत आहोत. आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना मदत करण्यास वचनबद्ध आहोत’, असे विमान कंपनीच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे.
या घटनेबद्दल अधिक माहिती मिळू शकली नाही.राजस्थानच्या बारां जिल्ह्यात हॉट एअर बलूनच्या चाचणीदरम्यान झालेल्या अपघातात एका कर्मचाऱ्याचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. तीन दिवसांच्या बारां उत्सवात अखेरच्या दिवशी घडलेल्या या दुर्घटनेमुळे या उत्सवाला गालबोट लागले. वासुदेव खत्री (४०) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून, ते कोटा येथील रहिवासी होते. बारां येथील खेल संकुलात सकाळी ७ वाजता ही घटना घडली.येथील एका हॉट एअर बलूनची एक दोरी खत्री यांच्या हातात असतानाच, या बलूनने अचानक आकाशात उड्डाण केले. तो ६० फुटांवर पोहोचला असता, ही दोरी तुटली आणि खत्री खाली कोसळले. त्यांना तातडीने बारां जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे त्यांनी प्राण सोडले. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
Video Player
00:00
00:00