दहशतवादी आसिफच्या घरात स्फोट, तर आदिलच्या घरावर बुलडोझर; पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई.

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांवर कारवाई करत सुरक्षा दलांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे. आसिफ शेखच्या घरात स्फोटके सापडल्याने झालेल्या स्फोटात त्याचे घर उध्वस्त झाले, तर आदिल गुरीचे घर बुलडोझरने जमीनदोस्त करण्यात आले. लष्कर-ए-तैयबाशी संबंधित असलेल्या या दहशतवाद्यांचा सुरक्षा दल कसून शोध घेत असून, या हल्ल्याच्या तपासासाठी NIA देखील सक्रिय आहे.जम्मू – काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांची मोठी कारवाई समोर आली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं होतं. यानंतर आता सुरक्षा यंत्रणांनी मोठी मोहीम सुरू केली आहे. सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांच्या घरावर कारवाई केली आहे.पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आसिफ शेख आणि आदिल गुरी ही दोन नावं समोर आली आहेत. पोलीस आसिफ आणि आदिलच्या घरी सर्च ऑपरेशन करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्रालमध्ये जम्मू – काश्मीर पोलीस दहशतवादी आसिफच्या घरी पोहोचले.

त्याच्या घरात स्फोटकांचा साठा होता, त्याचा स्फोट झाला, अशी माहिती आहे. याशिवाय जम्मू – काश्मीर पोलिसांनी बुलडोझर वापरून दहशतवादी आदिलच्या घरावर कारवाई करत त्यांचं घर पाडलं.सुरक्षादल आसिफच्या घरी गेले असता त्यांना संदिग्ध सामान दिसलं. धोक्याची शक्यता पाहता सुरक्षा दलाचे जवान तिथून मागे हटले, त्याचवेळी मोठा स्फोट झाला आणि त्याचं घर स्फोटाने उडालं. घरात विस्फोटक सामान असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळेच स्फोट झाल्याचं ते म्हणाले.आदिल गुरीचं घर बुलडोझरने उडवण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, तो २०१८ मध्ये कायदेशीररित्या पाकिस्तानला गेला होता. त्याने पाकिस्तानमध्ये दहशतवादी प्रशिक्षण घेतल्याचा आरोप आहे. तो गेल्या वर्षीच जम्मू आणि काश्मीरला परतला होता.ज्या दहशतवाद्यांवर सुरक्षा दलांनी कारवाई केली ते दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित आहेत. २२ एप्रिल रोजी बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित व्हिडिओमध्ये हे दोघेही दिसत होते.

त्याच दोघांचे आसिफ आणि आदिलच्या घरावर कारवाई करण्यात आली आहे. त्याशिवाय इतर दहशतवाद्यांचाही शोध सुरू आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील सर्व दहशतवादी अजूनही आजूबाजूच्या परिसरात लपून बसले आहेत, अशी प्राथमिक माहिती मिळते आहे.पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांपर्यंत पोहोचण्यासाठी जम्मू-काश्मीर पोलिसांनी आतापर्यंत २००० लोकांची चौकशी केली आहे. या चौकशीसाठी अनेक लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात पर्यटकांना त्यांचा धर्म विचारुन गोळी मारण्यात आली. या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी एनआयए (NIA) तपास करत आहे. भारतीय लष्कर, जम्मू – काश्मीर पोलीस आणि इतर सुरक्षा एजन्सी दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात एकूण २६ जणांचा मृत्यू झाला होता. अनंतनागचा रहिवासी आदिल शाह वगळता सर्व २५ जण हिंदू होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.