शिवसेना आमदार अर्जुन खोतकरांसह त्यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी, रील्स बनवून शिवीगाळ, राजकीय वर्तुळात खळबळ.

शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे जालना मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अभिमन्यू खोतकर यांनी यासंदर्भात जालना तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चार वेगवेगळ्या इंस्टाग्राम अकाउंटवरून आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांच्याविरुद्ध अश्लील शिवीगाळ करत,

त्यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेमुळे जालन्यात एकच खळबळ उडाली आहे. अभिमन्यू खोतकर यांनी यासंदर्भात जालना तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून, या प्रकरणाचा वेगाने तपास सुरू आहे. संबंधित इंस्टाग्राम अकाउंटची सखोल चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.

दरम्यान, जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये २८ पर्यटकांचा मृत्यू झालाय. यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.यावर शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  जम्मू-काश्मीरमधील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध! जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड आणि अमानवी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा बळी गेला, ही अतिशय वेदनादायक बाब आहे. या दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करतो, असे त्यांनी म्हटले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.