मेंढपाळाचा मुलगा झाला IPS, कागल तालुक्यातील बीरदेवची अनोखी कहाणी; निकालावेळी राखत होता मेंढ्या.

बीरदेव हा ध्येयापासून कधी ढळला नाही. त्याला ‘यूपीएससी’ परीक्षेतील यशाची पूर्ण खात्री होती. काही दिवसापूर्वी त्याने नौदलामध्ये नोकरी करीत असलेला मित्र यश घाटगेला दूरध्वनीवरून बोलताना सांगितले होते की, ‘माझे ध्येय अंतिम टप्प्यात आहे. मुलाखत चांगली झाली आहे. निवड निश्चित आहे. मात्र कोणाला आता काही सांगू नको. निकाल जाहीर होऊ दे.’ निकालानंतर बीरदेवचा विश्वास किती सार्थ होता याची प्रचिती आली.वडील मेंढपाळ, आई गृहिणी. मात्र, त्यांच्या मुलाची जिद्द अफाट. स्वप्नं ही मोठे. भारतीय प्रशासकीय सेवेत करिअर करण्याचे! ‘यूपीएससी’ची परीक्षा उत्तीर्ण होऊन ‘आयपीएस’ व्हायचे. परिस्थितीचा बाऊ न करता मेहनत केली. मन लावून अभ्यास केला आणि २०२४ मध्ये केंदीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत ५५१ रँकने उत्तीर्ण होऊन चक्क ‘आयपीएस’ झाला. ही अनोखी कहाणी आहे, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे येथील बीरदेव सिद्धाप्पा डोणे या तरुणाची. विशेष म्हणजे, ‘यूपीएससीची’ निकाल जाहीर झाला तेव्हा बीरदेव बेळगाव परिसरात आई-वडिलासोबत मेंढ्या राखत होता.

बीरदेवच्या माध्यमातून कागल तालुक्यात पहिला आयपीएस अधिकारी ठरणार आहे. या उत्तुंग यशाबद्दल त्याच्यावर चहूबाजूंनी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. बीरदेव हा शालेय जीवनापासूनच हुशार विद्यार्थी. त्याच प्राथमिक शिक्षण यमगेच्या विद्यामंदिर येथे, तर माध्यमिक शिक्षण जय महाराष्ट्र हायस्कूल येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षण मुरगूडच्या शिवराज विद्यालय ज्युनिअर कॉलेजमध्ये झाले. दहावी आणि बारावी परीक्षेत तो मुरगूड केंद्रात अव्वल होता. गणित विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळवले होते. बीरदेवने इंजिनीअरिंगची पदवी पुण्याच्या ‘सीओईपी’ कॉलेजमध्ये झाले. मात्र, त्याचे ध्येय होते, आयपीएस होण्याचे. त्यासाठी त्यांनी दिल्ली गाठली. दिल्लीमध्ये आयपीएस परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठीचे क्लास सुरू ठेवले होते. दिवसातून २२ तास अभ्यास केला.बीरदेव हा ध्येयापासून कधी ढळला नाही. त्याला ‘यूपीएससी’ परीक्षेतील यशाची पूर्ण खात्री होती.

काही दिवसापूर्वी त्याने नौदलामध्ये नोकरी करीत असलेला मित्र यश घाटगेला दूरध्वनीवरून बोलताना सांगितले होते की, ‘माझे ध्येय अंतिम टप्प्यात आहे. मुलाखत चांगली झाली आहे. निवड निश्चित आहे. मात्र कोणाला आता काही सांगू नको. निकाल जाहीर होऊ दे.’ निकालानंतर बीरदेवचा विश्वास किती सार्थ होता याची प्रचिती आली.मंगळवारी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्या वेळी बीरदेव हा बेळगाव जिल्हयातील मामाच्या गावी होता. मेंढ्या राखत होता. बीरदेवच्या यशात कुटुंबांचा मोठा वाटा आहे. बीरदेवचे वडील सिद्धापा डोणे हे बारावीपर्यंत शिकले आहेत. त्यांनी मुलाला उच्चपदस्थ अधिकारी बनविण्याच्या उद्देशाने शिक्षण दिले. बीरदेवचा भाऊ वासुदेव डोणे हा चार वर्षापूर्वी भारतीय सैन्यात भरती झाला आहे. डोणे कुटुंबीयांची परिस्थिती बेताची. दिल्लीतील खर्च पेलवणारा नव्हता. त्यामुळे ‘या परीक्षेचा नाद सोड आणि एखादी नोकरी कर,’ असा सल्ला वडिलांना दिला होता. मात्र, बीरदेव जिद्दी होता. आयपीएस होणारच हे त्याने सांगितले होते. अखेर त्यांनी शब्द खरा करून दाखविला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.