जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी जोर धरु लागली आहे.जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी जोर धरु लागली आहे. निष्पाप पर्यटकांना दहशतवादी हल्ल्यात जीव गमवावा लागला. त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. पहलगाम हल्ल्याबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला. मुस्लिम समाजाला त्यांनी खास आवाहनही केलं.
शुक्रवारच्या नमाजावेळी (नमाज-ए-जुम्मा) सगळ्या मुस्लिमांनी त्यांच्या दंडावर काळी पट्टी बांधून मशिदीत जावं. त्यामुळे दहशतवादाविरोधात एकजुटीचा संदेश जाईल. दंडावर पट्टी बांधून आपण सगळ्यांना स्पष्ट संदेश देऊ. आम्ही भारतीय परदेशी शक्तींना इथली शांतता धोक्यात आणू देणार नाही. या हल्ल्यानंतर शांतता भंग करण्याच्या प्रयत्नात असलेल्या शक्ती काश्मिरी मुस्लिमांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करू शकतात. अशा परिस्थितीत आपल्या सगळ्यांना एक होऊन शत्रूचा कट हाणून पाडायचा आहे. त्यांचा अंतस्थ हेतू हाणून पाडणं अतिशय गरजेचं आहे. मी तमाम भारतीयांना आवाहन करतो की शत्रूच्या जाळ्यात अडकू नका, असं ओवैसी म्हणाले.









