पहलगाम घटनेवर सर्वपक्षीय बैठक पार पडली; विरोधी पक्षनेते म्हणतात, ‘कोणत्याही कारवाईसाठी विरोधकांचा पाठिंबा…’

पहलगाम घटनेचे पडसाद आता देशभर उमटू लागले आहेत. यानंतर केंद्र सरकारने आज पहलगाम घटनेवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. बैठकीनंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी महत्वाचे भाष्य केले आहे.पहलगाममधील क्रुर हल्ल्यात २८ पर्यटकांना प्राण गमवावे लागले आहेत. या घटनेचे पडसाद आता देशभर उमटू लागले आहेत. यानंतर केंद्र सरकारने आज पहलगाम घटनेवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला सत्ताधारी मंत्री आणि खासदारदारांसह विरोधकही उपस्थित होते. बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी म्हटले ‘सरकारला कोणतीही कारवाई करण्यासाठी पूर्ण पाठिंबा असेल.’आज सायंकाळी सर्वपक्षीय बैठक पार पडली. यावेळी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि गुप्तचर अधिकाऱ्यांनी उपस्थित नेत्यांना घटनेसंदर्भात तसेच भविष्यातील निर्णयाबाबत माहिती दिली. बैठक पार पडल्यानंतर राहुल गांधींनी सरकारला योग्य ती कारवाई करण्यासाठी पाठिंबा दर्शवला आहे.

गांधी म्हणाले, सर्वांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. सरकारला कोणतीही कारवाई करण्यासाठी विरोधी पक्षाने पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे.कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंनीही जम्मू आणि काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न आवश्यक असल्याचे म्हटले आहे. खर्गे म्हणाले, ‘ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या नेतृत्वात बैठक पार पडली, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते. सर्व पक्षांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. आम्ही म्हटले की, जम्मू आणि काश्मीरमध्ये शांतता राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत…”दरम्यान तृणमुल काँग्रेसचे खासदार सुदीप बंडोपाध्याय यांनी नमूद केले की,

‘दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आम्ही सरकारसोबत आहोत. देशाने एकजुटीने याचा सामना केला पाहिजे. सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी पंतप्रधानांना संदेश दिला आहे.’भारताचे मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखले जाणाऱ्या निसर्गरम्य अशा पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. ज्यामध्ये २६ जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. यानंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. भारत सरकारने पाकिस्तानला प्रत्युत्तर म्हणून कठोर पाऊलं उचलली आहेत. भारत पाकिस्तानमधील सिंधू जल करार रद्द करण्यात आला आहे. तसेच पाकिस्तानी नागरिकांना व्हिला बंद करण्यात आला आहे आणि अटारी-वाघा बॉर्डर सुद्धा बंद कऱण्यात आलं आहे. परिणामी भारत पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.