स्विमिंग पूलमध्ये पोहताना अनर्थ, BAMS च्या दोघा विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू, मित्रांदेखतच प्राण सोडले.

रेनबो नावाने सुरू असलेल्या या जलतरण तलावात विवेक आणि सूरज हे अन्य चार मित्रांसोबत सायंकाळी पोहण्यासाठी गेले. मात्र दोघांचाही बुडून मृत्यू झालामित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या बीएएमएसच्या दोन विद्यार्थ्यांचा चिखलीतील जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
विवेक अरुण वायले (वय २२) रा. पाथर्डी (अकोला) व सूरज सुनील पानखडे (वय २२) रा. गेवराई (बीड) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही चिखली येथील सुनील रामसिंह चुनावाले आयुर्वेदिक महाविद्यालयात बीएएमएसच्या द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होते.चिखलीतील तालुका क्रीडा संकुलचा जलतरण तलाव एकाने भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी घेतला आहे. रेनबो नावाने सुरू असलेल्या या जलतरण तलावात विवेक आणि सूरज हे अन्य चार मित्रांसोबत सायंकाळी पोहण्यासाठी गेले. मात्र दोघांचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना नेमकी कशी घडली, याबाबत माहिती समजू शकली नाही.

चिखली पोलिस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.दुसरीकडे, श्रीनगरहून दिल्लीला विमान घेऊन आलेल्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या वैमानिकाचे दिल्लीमध्ये अचानक निधन झाले. दिल्लीत विमान उतरवल्यानंतर या वैमानिकाची तब्येत बिघडली. त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तेथे त्याचे निधन झाले.‘प्रकृती अस्वास्थ्यामुळे एक सहकारी आम्हाला सोडून गेल्याचे आम्हाला मनापासून दुःख आहे. या कठीण प्रसंगाला तोंड देत असताना आम्ही त्यांना संपूर्ण सहकार्य करीत आहोत. आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना मदत करण्यास वचनबद्ध आहोत’, असे विमान कंपनीच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे.

या घटनेबद्दल अधिक माहिती मिळू शकली नाही.राजस्थानच्या बारां जिल्ह्यात हॉट एअर बलूनच्या चाचणीदरम्यान झालेल्या अपघातात एका कर्मचाऱ्याचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. तीन दिवसांच्या बारां उत्सवात अखेरच्या दिवशी घडलेल्या या दुर्घटनेमुळे या उत्सवाला गालबोट लागले. वासुदेव खत्री (४०) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून, ते कोटा येथील रहिवासी होते. बारां येथील खेल संकुलात सकाळी ७ वाजता ही घटना घडली.येथील एका हॉट एअर बलूनची एक दोरी खत्री यांच्या हातात असतानाच, या बलूनने अचानक आकाशात उड्डाण केले. तो ६० फुटांवर पोहोचला असता, ही दोरी तुटली आणि खत्री खाली कोसळले. त्यांना तातडीने बारां जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे त्यांनी प्राण सोडले. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

  • Related Posts

    शासकिय आशादिप महिला वसतीगृह, जळगांव येथील विद्यार्थिनी लक्ष्मी शिंदे बारावी पास.

    शासकिय आशादिप महिला वसतीगृह, जळगांव येथील अनाथ प्रवेशीता लक्ष्मी विलास शिंदे हि प्रवेशिता  आज दिनांक 18/06/2024 रोजी मुलींचे निरीक्षणगृह, जळगांव येथून दाखल झालेली होती. संस्थेतून तिच्या पुढील शिक्षणा साठी (12…

    शिवतेज माहिती अधिकार संघटनेच्या आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी जितेंद्र पाटील यांची सर्वानुमते सहर्ष निवड.

    माहिती अधिकार व पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत असतांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवत माहिती अधिकार व पत्रकारीतेची चळवळ सक्षम आणि सशक्त करण्याच्या हेतुने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष  हारून अ. समद शेख व राष्ट्रीय महासचिव…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    शासकिय आशादिप महिला वसतीगृह, जळगांव येथील विद्यार्थिनी लक्ष्मी शिंदे बारावी पास.

    शासकिय आशादिप महिला वसतीगृह, जळगांव येथील विद्यार्थिनी लक्ष्मी  शिंदे बारावी पास.

    शिवतेज माहिती अधिकार संघटनेच्या आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी जितेंद्र पाटील यांची सर्वानुमते सहर्ष निवड.

    शिवतेज माहिती अधिकार संघटनेच्या आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी जितेंद्र पाटील यांची सर्वानुमते सहर्ष निवड.

    इन्स्टावर बहिणीचा फोटो का पाठवला? विचारायला गेलेल्या भावाची हत्या; उचललं अन् दगडावर आपटलं.

    इन्स्टावर बहिणीचा फोटो का पाठवला? विचारायला गेलेल्या भावाची हत्या; उचललं अन् दगडावर आपटलं.

    खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी – पालकमंत्री गुलाबराव पाटील

    खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी – पालकमंत्री गुलाबराव पाटील