
न्यूयॉर्कमधील हडसन नदीमध्ये एक हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत तीन मुलांसह सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये स्पेनमधील एका कुटुंबातील पाच सदस्य आणि पायलट यांचा समावेश आहे. न्यूयॉर्कचे महापौर एरिक ऍडम्स यांनी ही माहिती दिली. अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.न्यूयॉर्कच्या हडसन नदीत हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे. ही दुर्घटना स्थानिक वेळेनुसार गुरुवारी घडली. न्यूयॉर्कचे महापौर एरिक ॲडम्स यांनी यासंदर्भात माहिती दिली. मृतांमध्ये स्पेनमधील एकाच कुटुंबातील पाच सदस्य आणि हेलिकॉप्टरच्या पायलटचा समावेश आहे. हेलिकॉप्टर ‘न्यूयॉर्क हेलिकॉप्टर्स’ या कंपनीचे होते. FAA आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) या दुर्घटनेची चौकशी करत आहेत.
पर्यटकांच्या कुटुंबाला घेऊन जाणारे हेलिकॉप्टर हडसन नदीत कोसळून एकाच कुटुंबातील पाच जणांसह 6 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. स्पेनमधील सीमेन्स मोबिलिटी कंपनीचे सीईओ ऑगस्टिन, त्यांची पत्नी आणि तीन मुलांना या दुर्घटनेत प्राण गमवावे लागले. दुर्घटनेनंतर घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले. महापौर ॲडम्स म्हणाले, “मृतांचे नातलग आणि मित्र परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहेत.” दुर्घटनेच्या कारणांचा तपास सुरू आहे.हेलिकॉप्टर मॅनहॅटनच्या वरून स्थानिक वेळेनुसार दुपारी 2:59 वाजता निघाले होते. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, त्यांनी हेलिकॉप्टरचे काही भाग आकाशातून पडताना पाहिले. एका व्हिडिओमध्ये हेलिकॉप्टर हवेतच उलटून नदीत पडताना दिसले. जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिजजवळ वळण घेतल्यानंतर हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.न्यूयॉर्कचे अग्निशमन आयुक्त रॉबर्ट टकर यांनी सांगितले की, दुर्घटनेची पहिली सूचना दुपारी 3:17 वाजता मिळाली.