आईनेच नवजात चिमुकलीला संपवलं, पोलीस तपासात संतापजनक कारण समोर; नाक-तोंड…

पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये एका आईने आपल्या नवजात मुलीची हत्या केली. या प्रकरणी डहाणू पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. महिलेला तीन मुली असून, पुन्हा मुलगी झाल्याने नैराश्यातून तिने हे पाऊल उचललं असल्याची माहिती आहे.मातृत्वाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यातील डहाणू परिसरात घडली आहे. चौथे आपत्य मुलगीच झाल्याने जन्मदात्या आईनेच आपल्या मुलीची हत्या केली आहे. याप्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे.डहाणू तालुक्यातील लोणीपाडा परिसरात पूनम शहा, सासर – पश्चिम बंगाल येथील रहिवासी असलेली महिला गरोदर असल्याने काही दिवसांपूर्वी तिच्या आईच्या घरी प्रसूतीसाठी आली होती. लोणीपाडा येथे या महिलेची सुरक्षित गृह प्रसूती झाली. यावेळी तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. गृहप्रसूती झाल्यानंतर महिलेला तिच्या बाळासह डहाणू येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

मात्र शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास पूनम शहा या महिलेने तिच्या बाळाच्या नाकातोंडावर हात ठेवून बाळाची हत्या केली.याप्रकरणी डहाणू पोलिसांनी तपास आणि चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. पूनम शहा (वय ३२) असं या महिलेचं नाव आहे. पूनम शहा या महिलेने स्वतःच्या बाळाची हत्या केल्याची कबुली दिली आहे. पूनम शहा या महिलेचं सासर पश्चिम बंगाल येथील असून, माहेर उत्तर प्रदेशातील आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून तिचे आई-वडील डहाणूतील लोणीपाडा परिसरात राहतात. पूनम शहा हिला तीन मुली असून पुन्हा गरोदर असल्याने ती प्रसुतीसाठी लोणीपाडा येथे आली होती. मात्र प्रसूती झाल्यानंतर चौथे आपत्य देखील मुलगी झाल्याने पूनम शहा हिने टोकाचं पाऊल उचलत स्वतःच्याच पोटच्या बाळाची नाकतोंड दाबून हत्या केली.

याप्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.चौथी मुलगी झाल्याच्या नैराश्येतून महिलेने आपल्या तान्ह्या बाळाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना डहाणूमध्ये घडली. या प्रकरणी डहाणू पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. डहाणूतील लोणीपाडा येथे २५ एप्रिल रोजी आई-वडिलांच्या घरात तिची प्रसूती झाली. तिला चौथी मुलगी झाली. जन्मत: बाळाचे वजन ३ किलो होते. त्यानंतर तिला बाळासह डहाणू उपजिल्हा रुग्णालयातल्या प्रसूतीपश्चात काळजी कक्षात दाखल करण्यात आलं होतं. बाळ-बाळंतिणीची प्रकृती व्यवस्थित होती, अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.