पोलिसांनी केली उकल : पैशांचा हव्यासापोटी मेव्हण्याने केला शालकाचा खून !

जिल्ह्यातील अनेक ठिकाणी हाणामारी व खुनाच्या घटना सातत्याने घडत असतांना आता सख्या मेव्हण्याने शालकाच्या नावे असलेली विमा पॉलिसी व दिलेल्या स्कुटीचा अपघातात विम्याचा लाभ मिळवण्यासाठी फागणे येथील शालकास पारोळा हद्दीत ठार मारून त्याचा अपघात झाल्याची माहिती पोलिसांना देऊन बनवाबनवी केली होती. याप्रकरणी मेव्हण्यासह त्याच्या एका साथीदारास पोलिसांनी सखोल माहितीच्या आधारे २७ रोजी ताब्यात घेतल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी पारोळा येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत उपनिरीक्षक अमरसिंह वसावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रारंभी १७ रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास मयत समाधान शिवाजी पाटील (वय २६) याचा पारोळा हद्दीत अपघात झाल्याची नोंद धुळे पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. ही नोंद झिरो नंबरने पारोळा पोलीस ठाण्यात आल्यानंतर १९ रोजी अकस्मात मृत्यू म्हणून दाखल करण्यात आली. त्यानंतर त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमरसिंह वसावे यांच्याकडे देण्यात आला. या वेळी पो.नि. सुनील पवार यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक अमरसिंह वसावे, हवलदार सुनील हटकर, किशोर भोई यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यात घटनेचे ठिकाण व घटनेचे स्वरूप हे संशयास्पद दिसून आले.

यामुळे वरिष्ठांच्या मार्गदर्शनात व घटनेचे गांभीर्य पाहता घटनेचा सखोल तपास करण्याचे चौकशी अधिकारी पो.उ.नि. अमरसिंह वसावे, हवालदार सुनील हटकर, हवालदार संजय पाटील, हवालदार अनिल राठोड, हवालदार अभिजीत पाटील यांच्या पथकाला आदेश देण्यात आले. या पथकाने संशयित व इतर संबंधित व्यक्तींचे सर्व कंपनीचे मोबाईल क्रमांक प्राप्त करून त्याचे सीडीआर काढले. तर संदीप पाटील याने दिलेली खबर व प्रत्यक्षदर्शी पुरावे यात तफावत असल्याचे दिसून आले. त्यानंतर तपास पथकाने घटना घडल्यापासून पारोळा शहर, अमळनेर शहर, धुळे अशा ठिकाणी तपास पथक रवाना करून सीसीटीव्ही फुटेज तपासून माहिती मिळवली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.