मुलगी आयएएस अधिकारी झाल्याचा आनंद अन वडिलांचा दुर्देवी मृत्यू !

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल नुकताच लागला अआहे तर यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील वागद ईजारा येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. मुलगी आयएएस अधिकारी झाल्याचा आनंद साजरा करत असतानाच वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आणि यातच त्यांचे निधन झाले. प्रल्हाद खंदारे असे मृत्युमुखी पडलेल्या वडिलांचे नाव आहे. पुसद पंचायत समितीचे ते सेवानिवृत्त विस्तार अधिकारी होते.

प्रल्हाद खंदारे यांची मुलगी मोहिनी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत आयएएस अधिकारी पदावर निवड झाली. या क्षणाचा आनंद साजरा करण्यासाठी गावात मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, या कार्यक्रमातच प्रल्हाद खंदारे यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने महागाव येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. खंदारे कुटुंबावर यामुळे शोककळा पसरली आहे. आनंदाचा क्षण क्षणात दुःखात बदलून गेला.आपल्या लेकीला आयएएस अधिकारी पाहण्याचे वडिलांचे स्वप्न पूर्ण तर झाले परंतु त्याचा आनंद साजरा नाही करता आला. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. प्रल्हाद खंदारे यांच्या पश्चात पत्नी प्रमिला, मुंबई जिल्हा न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश असलेले पुत्र विक्रांत, नव्यानेच आयएएस परीक्षेत उत्तीर्ण झालेली मुलगी मोहिनी, स्नुषा स्वाती व बराच मोठा आप्त परिवार आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.