जुना राग अन् संतापाची धगधगती आग; 17 वर्षीय मुलाला वार करून संपवलं.

पूर्ववैमनस्यातून पाच जणांनी मारहाण करत एकाची निर्घुण हत्या केल्याची घटना नाशिक जिल्ह्यात घडली आहे.नांदगाव तालुक्यातील वाखारी शिवारात रवींद्र उर्फ मुन्ना दीपक आहिरे (१७, रा. बोधे) या युवकास पूर्ववैमनस्यातून पाच जणांनी मारहाण करत गळा चिरून त्याचा निर्घुण खून केल्याची घटना बुधवारी रात्री घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी  या घटनेची माहिती मिळताच चौकशीची सूत्रे वेगाने फिरवत चार संशयितांना अटक केली आहे. मुलीचे नाव घेतल्याच्या पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. नांदगाव तालुक्यातील वाखारी शिवारातील जंगलात युवकाचा मृतदेह आढळला आहे. खून झालेल्या रवींद्र अहिरे याचे बडील दीपक आहिरे (42) यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात  दाखल केलेल्या फिर्यादीत स्वींद्र ऊर्फ मुन्ना दीपक आहिरे (17, रा. बोधे दहिवाळ, ता. मालेगाव) यास पूर्ववैमनस्यातून आकाश शरद सोनवणे,

ऋषिकेश शरद पवार, विनोद शरद पवार, विजय एकनाथ सोनवणे, वींद्र अंकुश गायकवाड (सर्व रा. मोरवाडी साकुरी झाप, ता. मालेगाव) यांनी संगनमत करून मुलास जिवे ठार मारण्याचा कट रचून त्याच्या अंगावरील शर्ट फाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर रवींद्र अहिरे याला जिवे ठार मारण्याकरता त्याचा गळा धारधार शस्त्राने कापून मुलाचा खून करून त्यास तेथे सोडून पळून गेल्याचे नमूद केले आहे. या खुनाची पोलीस पाटील राकेश चव्हाण यांनी नांदगाव पोलिसांना माहिती दिली असता पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. सुनील बढे तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेऊन नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याने हल्लेखोरांचा शोध घेत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त कुटुंबीयांकडून करण्यात आली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नांदगाव पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत रवींद्र अहिरे याचा खून करणाऱ्या चार संशयित हल्लेखोरांना शिताफीने अटक करत त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.