पैशाचा पाऊस पाडतो, तीन अल्पवयीन मुलींना नग्नावस्थेत पुजेला बसवा; भोंदूबाबाकडून मुलींचे शोषण, नागपुरातील घटना.

 पुजेसाठी अल्पवयीन मुली लागतील असं सांगत त्या मुलींचे शारीरिक शोषण करण्यात आलं. या प्रकरणी भोंदू बाबाला अटक करण्यात आली आहे.पैशाचा पाऊस पाडतो, त्यासाठीच्या पूजेसाठी तीन अल्पवयीन मुली लागतील अशी बतावणी करून एका भोंदू बाबाने तीन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी भोंदू बाबा अब्दुल कुरैशी उर्फ कंदील बाबा याच्यासह एकूण आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. अब्दुल कुरैशी उर्फ कंदील बाबाने नागपुरात काही जणांना आपल्या जाळ्यात फसवल्याचं स्पष्ट झालं. पैशाचा पाऊस पाडणे शक्य आहे, त्यासाठी विशेष पूजा करावी लागेल, आणि त्यासाठी तीन अल्पवयीन मुली लागतील असं त्याने सांगितलं.

तिन्ही मुलींना पूजेच्या वेळेला नग्नावस्थेत बसावे लागेल अशी बतावणी केली होती. त्यानंतर आशू कोचे आणि गायत्री उकरे नावाच्या पुरुष आणि महिलेने तीन अल्पवयीन मुलींची व्यवस्था केली. काही दिवसांपूर्वी गायत्री उकरेच्या घरी पूजेचे आयोजन करण्यात आले आणि त्याच ठिकाणी भोंदू बाबाने तीनही अल्पवयीन मुलींचे एकानंतर एक असे शारीरिक शोषण केले. मुलींना यासाठी गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करण्यात आले होते.

भोंदू बाबाच्या या कृत्यानंतर पैशाचा पाऊस तर पडलाच नाही, मात्र तिन्ही मुलींना त्यांचे लैंगिक छळ झाल्याचे समजले. एका ओळखीच्या व्यक्तीच्या मार्फत तिघींनी नागपूरच्या मानकापूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी भोंदू बाबा अब्दुल कुरेशी याच्यासह गायत्री उकरे आणि आशू कोचे या तिघांना अटक केली आहे. पोलिसांना आरोपींच्या मोबाईलमध्ये इतर काही मुलींचे फोटो आढळल्यामुळे या भोंदू बाबा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आणखी काही मुलींचे लैंगिक शोषण केले आहे का याचा शोध पोलीस घेत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.