मुजोर कारचालकाचा प्रताप, दुचाकीस्वारांना चिरडण्याचा प्रयत्न, आधी तीन वेळा कट मारला अन् चौथ्यांदा थेट…

नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील सिबल हॉटेलजवळील सिग्नलवर केवळ दुचाकी बाजूला न घेतल्याच्या रागातून एका कारचालकाने दुचाकीस्वारांना चिरडण्याचा प्रयत्न केला.नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील  सिबल हॉटेलजवळील सिग्नलवर केवळ दुचाकी बाजूला न घेतल्याच्या रागातून एका कारचालकाने दुचाकीस्वाराचा पाठलाग करत तीन वेळा कट मारला आणि चौथ्या वेळी थेट धडक दिल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. 20) रात्री घडली होती. या अपघातात दुचाकीवरील दोन तरुण गंभीर जखमी झाले असून संबंधित कारचालकाला पोलिसांनी  सापळा रचून अटक केली आहे.शाहरुख फारूक शेख (24, रा. खडकाळी, भद्रकाली, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेचा थरार दुचाकीस्वाराच्या हेल्मेटवरील कॅमेऱ्यात कैद झाला असून, व्हिडिओच्या आधारे आणि घटनास्थळी मिळालेल्या कारच्या नंबरप्लेटवरून आरोपीचा शोध घेण्यात आला.

प्रेम प्रफुल्ल बोंडे (21, रा. सिटी मॉलच्या मागे, संभाजी चौक, उंटवाडी) याने गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी रात्री तो आपल्या आतेभावासोबत (आर्यन) दुचाकीवरून (एमएच 04 इके 7345) त्र्यंबकरोडने जात होता. यावेळी सिबल हॉटेलजवळील सिग्नलला लाल दिवा लागलेला असताना ते थांबले. त्यावेळी पाठीमागून काळ्या रंगाची कार (एमएच 15 जेए 5558) आली व कारचालकाने जोरजोरात हॉर्न वाजवून दुचाकी पुढे हटवण्यास सांगितले. मात्र, सिग्नल लाल असल्याने प्रेमने दुचाकी जागेवरच ठेवली.या घटनेने संतप्त झालेल्या कारचालकाने दुचाकीस्वारांचा सिबल हॉटेल ते सिटी सेंटर मॉलदरम्यान पाठलाग केला.

त्यादरम्यान त्याने तीन वेळा कट मारून दुचाकीला घासण्याचा प्रयत्न केला. यानंतर चौथ्यांदा कारचालकाने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील दोघे रस्त्यावर पडले आणि दोघेही गंभीर जखमी झाले. यानंतर कारचालक शाहरुख शेख झाला फरार होता. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात शेख याच्याविरुद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्न व अपघाताचे कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सापळा रचून शाहरुख फारुक शेख या कारचालकाला अटक केली आहे. तर शाहरुख  शेख याला न्यायालयात हजार केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.