आधी मुलीची छेड काढली, अन् नंतर लिफ्टमध्ये अर्धा तास डांबून ठेवलं; परप्रांतीयाची मुजोरी, मनसैनिकांनी दिला चोप.

घटनेची माहिती मिळताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्या आरोपीला धडा शिकवला आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अल्पवयीन मुली आणि महिलांवरील अत्याचारामध्ये वाढ  झाली आहे. अशातच मुलीची छेड काढून तिला अर्धा तास लिफ्टमध्ये डांबून ठेवण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पुणे शहरातील शिक्षण क्षेत्रातील दुर्दैवी घटना समोर आली आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातील कात्रज गोकुळनगर येथील टाकळकर क्लासेसमध्ये परप्रांतीय कर्मचाऱ्याकडून मुलीची छेड काढून तिला अर्धा तास लिफ्टमध्ये डांबून ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या संतापजनक घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पुणे शहराध्यक्ष महेश पांडुरंग भोईबार यांनी संबंधिताला मनसे स्टाईलने चोप दिला आहे.

सदर विषयाची माहिती मिळताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्या आरोपीला धडा शिकवला आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यामध्ये एका परप्रांतीय तरुणाने विद्यार्थिनीची छेड काढल्याची धक्कादायक घटना घडली. छेड काढल्यानंतर या तरुणाने या मुलीला अर्धा तास लिफ्टमध्ये डांबून ठेवलं होतं. या घटनेची माहिती मिळताच मनसैनिकांनी या परप्रांतीय तरुणाला चांगलाच चोप (Pune Crime News) दिला. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. परप्रांतीयाने विद्यार्थिनीची छेड काढल्याची माहिती मिळाल्यानंतर मनसैनिकांनी क्लासेसमध्ये धाव घेतली. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पुणे शहराध्यक्ष महेश पांडुरंग भोईबार यांनी या परप्रांतीय तरुणाला जाब विचारत त्याला चोप दिला.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.दरम्यान, पुणे शहरात क्लासेसमध्ये ही घटना घडल्याने नागरिकांनी आणि पालकांनी संताप व्यक्त केला आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात विद्यार्थिनीची छेड काढून तिला लिफ्टमध्ये अर्धा तास डांबून ठेवल्याचा प्रकार संतापजनक आहे. कात्रज गोकुळनगर येथील टाकळकर क्लासेसमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. क्लासमधील परप्रांतीय कर्मचाऱ्याने हे धक्कादायक कृत्य केले. त्यानंतर मनसेने त्याला चांगलाच चोप दिला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.