पुण्यात मेट्रो स्थानकांजवळ नवीन पार्किंग सुविधा सुरू होत आहेत, पुणेकरांची आता पार्किंगची चिंता कमी होणार!

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील प्रवाशांसाठी पुणे महानगरपालिका आणि पीएमआरडीएने महत्वाचा निर्णय घेतला आहे. मेट्रो स्थानकाजवळच्या ‘ॲमेनिटी स्पेस’वर वाहनतळ विकसित केले जाणार असून, शहरातील आठ आणि पीएमआरडीएच्या हद्दीतील दोन जागांचा समावेश आहे. यामुळे मेट्रो वापरणाऱ्या नागरिकांना त्यांच्या वाहनांसाठी पार्किंगची सोय उपलब्ध होणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाने भविष्यात प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी या मार्गावरील काही प्रमुख मेट्रो स्थानकांजवळील महापालिकेच्या ‘ॲमेनिटी स्पेस’वर वाहनतळ विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका हद्दीतील आठ, तर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील दोन अशा दहा ‘ॲमेनिटी स्पेस’वर वाहनतळ विकसित करण्यात येणार आहे. पुणे महापालिका हद्दीतील १३ हजार ५१ चौरस मीटर जागा या वाहनतळांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे.पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून ‘सार्वजनिक खासगी भागीदारी’ (पीपीपी) स्वरूपात हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो मार्ग विकसित करण्यात येत आहे. माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या २३ किलोमीटर लांचीच्या मार्गासाठी साडेआठ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

नागरिकांनी मेट्रोचा अधिकाधिक वापर करावा यासाठी मेट्रो स्थानकाच्या ५०० मीटरच्या परिसरात पार्किंगची सुविधा विकसित करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी महापालिकेच्या ‘ॲमेनिटी स्पेस’वर वाहनतळ विकसित करण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू करण्यात आली आहे.पुणे महापालिकेने मोठा गाजावाजा करून पार्किंग धोरण जाहीर केले होते. हे धोरण सध्या थंड बस्त्यात पडले असून, मेट्रो स्थानकांलगत विकसित केल्या जाणाऱ्या वाहनतळांवर वाहनचालकांकडून काय शुल्क घेतले जाणार, हेसुद्धा ठरवावे लागणार आहे. काही दिवसांपूर्वीच महामेट्रोने वाहनचालकांकडून अवाजवी शुल्क आकारण्याचे कंत्राट दिल्यानंतर त्याला मेट्रो प्रवाशांनी प्रचंड विरोध केला होता. त्यामुळे हे शुल्क स्थगित ठेवण्यात आले होते. मात्र, मेट्रोच्या तिकीट दरांपेक्षा पार्किंगचे शुल्क अधिक असू नये एवढीच अपेक्षा केली जात आहे.महापालिका हद्दीतील आठ, तर ‘पीएमआरडीए’च्या हद्दीतील दोन अशा दहा ‘ॲमेनिटी स्पेस’ शोधण्यात आल्या असून, त्या ठिकाणी वाहनतळ विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मेट्रोच्या या मार्गावर २३ स्थानके असून, पुणे महापालिका हद्दीत १४ स्थानके आहेत. या आठ ‘ॲमेनिटी स्पेस’ बालेवाडी आणि बाणेर परिसरातील आहेत. त्यामुळे या परिसरातील मेट्रो प्रवाशांना पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध होणार आहे.

महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी महापालिका हद्दीतील आठ ‘ॲमेनिटी स्पेस’ उपलब्ध करून देण्याचे आदेश महापालिका प्रशासनास दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या प्रकल्प विभागासह मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांची ‘पीएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली.महापालिका प्रशासनाकडून या आठ ‘ॲमेनिटी स्पेस’ विकसित करण्यात येणार आहेत. महापालिकेच्या सध्याच्या वाहनतळाप्रमाणेच हे नव्याने विकसित करण्यात येणाऱ्या वाहनतळांचा वापर होणार आहे. मेट्रो मार्गावर अधिकाधिक पार्किंग उपलब्ध करून देण्यासाठी ‘ॲमेनिटी स्पेस’चा वापर करण्यात येत आहे. शहराच्या आजूबाजूच्या ‘ॲमेनिटी स्पेस’वरही अशाच विचार व्हावा, अशी मागणीही जोर धरू लागली आहे. सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या दोन्ही मार्गालगत अशाच प्रकारे वाहनतळ विकसित करण्याची आवश्यकता आहे.- मेट्रो स्थानकाच्या ५०० मीटरच्या परिसरात पार्किंगची सुविधापुणे महापालिका हद्दीतील १३ हजार ५१ चौरस मीटर जागा या वाहनतळांसाठीमहापालिकेच्या ताब्यातील आठ ‘ॲमेनिटी स्पेस’वर वाहनतळ विकसित करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. महापालिकाच हे वाहनतळ विकसित करणार असून, इतर वाहनतळांप्रमाणे त्यांचा वापरही सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका, कार्यकारी अभियंता संदीप पाटील यांनी दिली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.