
मुलगी घरच्यांकडून त्रासली आहे मला तिला दत्तक घ्यायचे आहे असे पोलिसांना पोलिसांना एका व्यक्तीने सांगितले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यावर धक्कादायक सत्य समोर आले. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.स्वतःच्या कुकर्मावर पांघरूण घालण्यासाठी त्याने पोलिसांच्या हेल्पलाईनचा वापर केला. पण सत्य लपवता येत नाही, उल्हासनगरमध्ये एका विकृत ५० वर्षीय शेजाऱ्याने चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्यानंतर, स्वतः निर्दोष असल्याचा बनाव करत पोलिसांना 112 हेल्पलाईनवर कॉल करून मुलीच्या पालकांविरोधात खोटी तक्रार दिली. मात्र पोलीस उपायुक्त सचिन गोरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या तपासात सत्य उघडं पडलं आणि नराधम इंजिनिअरला अखेर अटक झाली.
पोलिसांची हेल्पलाईन नंबर – 112 ही सेवा नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुरू करण्यात आली, पण उल्हासनगरमध्ये एका विकृत व्यक्तीने तीच सेवा आपल्या घृणास्पद गुन्ह्याचं सत्य लपवण्यासाठी वापरली. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 50 वर्षीय इंजिनिअर आरोपीने आपल्या शेजारी राहणाऱ्या अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर ६ एप्रिल रोजी लैंगिक अत्याचार केल्यानंतर, पोलिसांची दिशाभूल करत 112 नंबरवर कॉल करून तिच्याच पालकांविरोधात खोटी तक्रार दिली. “मुलगी घरच्यांकडून त्रासली आहे, मला तिला दत्तक घ्यायचं आहे” असं भासवत त्याने पोलिसांसमोर सहानुभूतीच वेगळंच चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला.परंतु पोलिसांना या प्रकरणाचा संशय आल्याने त्यांनी या घटनेची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांना दिली.