
चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथे गुरुवारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. प्रज्वल नवले (21) नावाच्या युवकाचा मृतदेह आढळला, तर त्याचा मित्र नागेश लांडगे बेशुद्ध अवस्थेत सापडला. प्रेमप्रकरणातून हे घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागेश शुद्धीवर आल्यानंतरच सत्य समोर येईल. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.दोन मित्रापैकी एकाचा मृतदेह आढळला तर दुसरा बेशुद्ध अवस्थेत सापडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. ही घटना औद्योगिक शहर अशी ओळख असलेल्या गडचांदूर Chandrapur Crime येथे गुरुवारला उघडकीस आली. प्रज्वल गोवर्धन नवले (२१) असे मृतक युवकाचे नाव आहे. नागेश लांडगे हा तरुण बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. Chandrapur Crime News : प्रेम प्रकरणातून ही घटना घडल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
प्राप्त माहितीनुसार, गडचांदुर येथील प्रज्वल हा माणिकगड मार्गांवरील वरील एका गॅरेजमध्ये काम करत होता. त्याचे वडील गोवर्धन चिमूर येथे तर आई शीतल नवले गडचांदूर येथे राहतात. दोघे विभक्त असून प्रज्वल आईकडे राहत होता. बुधवारी त्याचा मित्र नागेश लांडगे हा प्रज्वलला भेटायला घरी गेला होता. नागेशच्या हालचालीवरून त्याचा आईला शंका आली. आईने नागेशचा मोबाइल ताब्यात घेतला. आईने मोबाइल ताब्यात घेतल्याने आपले सर्व बिंग फुटणार अशी भावना नागेशच्या मनात निर्माण झाली. प्रज्वलने आईला नागेशचा मोबाइल परत देण्याची विनंती केली. आईने प्रज्वललादेखील त्याचा मोबाइल मागितला.