दोन जिगरी घराबाहेर पडले, दुसऱ्या दिवशी एकाची बॉडी तर दुसरा तिथेच बेशुद्ध अवस्थेत, महाराष्ट्रातील धक्कादायक घटना.

चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथे गुरुवारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. प्रज्वल नवले (21) नावाच्या युवकाचा मृतदेह आढळला, तर त्याचा मित्र नागेश लांडगे बेशुद्ध अवस्थेत सापडला. प्रेमप्रकरणातून हे घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागेश शुद्धीवर आल्यानंतरच सत्य समोर येईल. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.दोन मित्रापैकी एकाचा मृतदेह आढळला तर दुसरा बेशुद्ध अवस्थेत सापडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. ही घटना औद्योगिक शहर अशी ओळख असलेल्या गडचांदूर Chandrapur Crime येथे गुरुवारला उघडकीस आली. प्रज्वल गोवर्धन नवले (२१) असे मृतक युवकाचे नाव आहे. नागेश लांडगे हा तरुण बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. Chandrapur Crime News : प्रेम प्रकरणातून ही घटना घडल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

प्राप्त माहितीनुसार, गडचांदुर येथील प्रज्वल हा माणिकगड मार्गांवरील वरील एका गॅरेजमध्ये काम करत होता. त्याचे वडील गोवर्धन चिमूर येथे तर आई शीतल नवले गडचांदूर येथे राहतात. दोघे विभक्त असून प्रज्वल आईकडे राहत होता. बुधवारी त्याचा मित्र नागेश लांडगे हा प्रज्वलला भेटायला घरी गेला होता. नागेशच्या हालचालीवरून त्याचा आईला शंका आली. आईने नागेशचा मोबाइल ताब्यात घेतला. आईने मोबाइल ताब्यात घेतल्याने आपले सर्व बिंग फुटणार अशी भावना नागेशच्या मनात निर्माण झाली. प्रज्वलने आईला नागेशचा मोबाइल परत देण्याची विनंती केली. आईने प्रज्वललादेखील त्याचा मोबाइल मागितला.

मात्र प्रज्वलने प्रथम नकार दिला व नंतर नागेशचा मोबाइल परत करण्याच्या बदल्यात स्वतःचा मोबाइल आईला दिला. नागेशचा मोबाइल परत मिळाल्यानंतर लगेच दोघे सायंकाळी सायकलने घराबाहेर गेले.दोघे घराबाहेर पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी ( गुरुवारी ) सकाळी प्रज्वल मृतावस्थेत आढळल्याची बातमी कुटुंबियांना मिळाली. यामुळे कुटुंब हादरले. प्रज्वलचा सोबतीला असलेला त्याचा मित्र नागेश बेशुद्ध अवस्थेत मिळाला. त्यामुळे ही घटना नेमकी का घडली याचे गूढ वाढले आहे.ही घटना प्रेमप्रकरणातून घडल्याची चर्चा आता सुरु आहे. नागेश शुद्धीवर आल्यानंतरच नेमकं काय घडलं याचा उलगडा होणार आहे. घटनेची माहिती मिळताच गडचांदूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.ठाणेदार शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

  • Related Posts

    रस्त्यांच्या साईट पट्ट्या लवकर कराव्या, मनसे उपशराध्यक्ष मेंगडे यांची मागणी.

    सावखेडा ते पिंप्राळा कॉंक्रिटीकरण रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून या रस्त्यावरील साईट पट्ट्या भरलेल्या नसल्यामुळे वाहनधारकाची अडचण निर्माण झाली आहे.   तसेच शंभर मीटर एरियामध्ये सोनी नगर नवीन बांधलेल्या पुलापासून सरकारमान्य…

    दहशतवादी हल्ल्यापूर्वी पहलगाममध्ये काय करत होती ज्योती मल्होत्रा, आयएसआय एजंटशी थेट संबंध?

    युट्युबर ज्योती मल्होत्राला अटक झाली आहे. तिच्यावर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे. ज्योतीचे पाकिस्तानमधील काही फोटो व्हायरल झाले आहेत. ती पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या पार्टीत सहभागी झाली होती. ज्योती आयएसआय एजंट दानिशच्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    रस्त्यांच्या साईट पट्ट्या लवकर कराव्या, मनसे उपशराध्यक्ष मेंगडे यांची मागणी.

    रस्त्यांच्या साईट पट्ट्या लवकर कराव्या, मनसे उपशराध्यक्ष मेंगडे यांची मागणी.

    दहशतवादी हल्ल्यापूर्वी पहलगाममध्ये काय करत होती ज्योती मल्होत्रा, आयएसआय एजंटशी थेट संबंध?

    दहशतवादी हल्ल्यापूर्वी पहलगाममध्ये काय करत होती ज्योती मल्होत्रा, आयएसआय एजंटशी थेट संबंध?

    अवकाळी पावसात भुईमूग वाहून गेला, महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषीमंत्र्यांचा कॉल, मदतीचं आश्वासन देत धीर दिला.

    अवकाळी पावसात भुईमूग वाहून गेला, महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषीमंत्र्यांचा कॉल, मदतीचं आश्वासन देत धीर दिला.

    ‘मगरीसारखे अश्रू…’ कर्नल सोफियांवर बेताल विधान करणाऱ्या नेत्याचीही माफीही अमान्य; सुप्रीम कोर्टाने काय आदेश दिले?

    ‘मगरीसारखे अश्रू…’ कर्नल सोफियांवर बेताल विधान करणाऱ्या नेत्याचीही माफीही अमान्य; सुप्रीम कोर्टाने काय आदेश दिले?