मिठी नदीखालून मेट्रो धारावीत; दोन स्थानकांची छायाचित्रे ‘एमएमआरसी ‘कडून प्रसिद्ध.

नदीखालून जवळपास २२ मीटर खोलीवर भुयारीकरण करीत मार्गिका धारावीत आली आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन स्थानकांची छायाचित्रे ‘एमएमआरसी’ने ‘एक्स’वर प्रसिद्ध केली आहेत. मिठी नदीखालून मार्ग काढीत भूमिगत मेट्रो ३ ही धारावीत पोहोचली आहे. लवकरच सुरू होण्याच्या मार्गावर असलेल्या मार्गिकेच्या या टप्प्यातील दोन स्थानकांची छायाचित्रे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमआरसी) प्रसिद्ध केली आहेत.मेट्रो ३ भूमिगत मार्गिका सध्या आरे जेव्हीएलआर ते वांद्रे-कुर्ला संकुलादरम्यान (बीकेसी) सुरू आहे. या मार्गिकेचा टप्पा २ अ धारावी ते आचार्य अत्रे चौक (वरळी नाका) असा असेल. त्यासाठी ही मार्गिका बीकेसी ते धारावीदरम्यान मिठी नदीखालून जाणार आहे. नदीखालून जवळपास २२ मीटर खोलीवर भुयारीकरण करीत मार्गिका धारावीत आली आहे.

त्या पार्श्वभूमीवर धारावी व शितलादेवी या स्थानकांची छायाचित्रे ‘एमएमआरसी’ने ‘एक्स’वर प्रसिद्ध केली आहेत.शेजारून आणि वरून वाहणारी मिठी नदी, भूसंपादनातील अडथळे, वाहतूक वळविणे, दाटीवाटीचा भाग, विविध प्रकारच्या बांधकामांचा पाया अशा सर्व आव्हानात्मक स्थितीत ‘धारावी’ स्थानक बांधण्यात आले, असे याबाबात ‘एमएमआरसी’ने म्हटले आहे. जुन्या इमारतींच्या गुंतागुंतीचा पाया, मोठ्या भूमिगत जलवाहिन्या या स्थितीत अभियांत्रिकी व क्षमता यांचे मिश्रण म्हणजे ‘शितलादेवी’ स्थानक असल्याचे एमएमआरसीने म्हटले आहे.

या मेट्रोच्या स्थानकांची नावे इंग्रजीत असल्याचा आरोप होता. त्यावर ‘एमएमआरसी’ ने स्पष्टीकरण देत, स्थानकांचे फलक इंग्रजी व मराठीत असल्याचे नमूद केले आहे. नावे मराठीत नाहीत, हा आरोप तथ्यहिन असल्याचे ‘एमएमआरसी’ने म्हटले आहे. टप्पा २ अ मधील सहा स्थानकांवर फलक लावण्याची कामे सुरू झाली ‘एमएमआरसी’ने कंपनीने म्हटले आहे

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.