आयसीयूचा अभाव बेतला जिवावर; चेंबूरमधील रुग्णाचा मृत्यू, ‘शताब्दी’त उपचार न मिळाल्याचा कुटुंबीयांचा आरोप.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये शताब्दीमध्ये आलेल्या अशाच एका रुग्णाला येथील आयसीयू सुविधा बंद असल्याने प्राण गमावावे लागल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहेगोवंडी येथील शताब्दी रुग्णालयातील वैद्यकीय सेवांची उपलब्धता मागील दोन-तीन महिन्यांपासून टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील रुग्णांना थेट घाटकोपरमधील राजावाडी किंवा शीवमधील लो. टिळक रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये शताब्दीमध्ये आलेल्या अशाच एका रुग्णाला येथील आयसीयू सुविधा बंद असल्याने प्राण गमावावे लागल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. सर्वसामान्य रुग्णांच्या जिवाची किंमत नाही का, असा उद्विग्न प्रश्न त्यांच्या कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे.चेंबूर, घाटला येथे राहणारे, एका खासगी कंपनीमध्ये काम करणारे अविनाश शिरगावकर (४५) यांना सोमवारी सकाळपासून मूत्रविसर्जनास त्रास होत होता. कुटुंबीयांनी त्यांना गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयामध्ये नेले. तिथे अतिदक्षता विभाग बंद असून तज्ज्ञ डॉक्टरही नसल्याचे सांगण्यात आले.

खूप त्रास होत असल्याने नळीद्वारे लघवी काढल्यास त्यांना थोडा आराम मिळेल, त्यानंतर त्यांना दुसरीकडे हलवता येईल, या कुटुंबियांच्या विनंतीकडेही दुर्लक्ष करण्यात आले. अविनाश यांना पुढे ‘राजावाडी’मध्ये नेण्यात आले, तिथे ईसीजी काढून, गोळ्या देऊन घरी पाठवण्यात आले. मात्र संध्याकाळी उशिरापर्यंत त्रास वाढल्याने, त्यांना शीव येथील लो. टिळक रुग्णालयामध्ये नेण्यात आले. मात्र तिथे उपचार सुरू केल्यानंतर काही तासांत त्यांचा मृत्यू झाला.सकाळी वेदना सुरू होऊन प्रत्यक्ष व्यवस्थित उपचार सुरू होईपर्यंत आठ-दहा तासांचा कालावधी गेला. रुग्णवाहिका न मिळाल्याने अविनाश यांना टॅक्सीने न्यावे लागले. वैद्यकीय तपासण्या, निदान, तज्ज्ञ डॉक्टरांसाठी धावाधाव, आयसीयूचा अभाव हे त्यांच्या जिवावर बेतले, असे त्यांच्या भावाने सांगितले.

अविनाश यांच्यामागे पत्नी, दोन मुले, वडील आहेत.यासंदर्भात उपनगरीय रुग्णालयाचे प्रमुख डॉ. चंद्रकांत पवार यांच्याशी संपर्क साधला असता, संबंधित रुग्णाला शस्त्रक्रियेची गरज असल्याने मुख्य रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले, असे त्यांनी सांगितले. रुग्णालयात आयसीयू सुविधा सुरू आहे का, यासंदर्भात विचारणा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.सर्वसामान्यांच्या आरोग्यप्रश्नावर सातत्याने काम करणारे स्थानिक व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नगराळे यांनीही काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले. शताब्दी रुग्णालयात मागील काही महिन्यांपासून डॉक्टर नाही, आयसीयू सुविधा नाही, अशा तक्रारी सातत्याने येत आहेत. ‘गोल्डन अवर’चे महत्त्व आता तरी रुग्णालय प्रशासनाला कळले आहे का?’ असा प्रश्न नगराळे यांनी उपस्थित केला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.