पत्नी कोमात, दोन्ही उच्चशिक्षित मुलं मुंबईत; नैराश्यातून निवृत्त मुख्याध्यापकाचा धक्कादायक निर्णय, घटनेनं खळबळ.

मुरलीधर जोशी हे पत्नी लता यांच्यासह उंबरखेड (जि. जळगाव) येथील एका शाळेत मुख्याध्यापक होते. निवृत्त झाल्यानंतर २०१७ मध्ये ते जेलरोड येथे राहण्यास आले होते.पत्नीची हत्या करून निवृत्त मुख्याध्यापकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जेलरोड येथे बुधवारी घडली. पत्नीही निवृत्त मुख्याध्यापिका होती. मुरलीधर रामचंद्र जोशी (वय ७८,रा. एकदंत अपार्टमेंट, जेलरोड) व लता जोशी (७६) अशी मृतांची नावे आहेत.ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. आमच्या मृत्यूबद्दल कोणालाही दोषी ठरवू नये, असाही उल्लेख पत्रात नमूद केला आहे. पत्नीच्या आजारपणामुळे नैराश्य आल्याने तिचे जीवन संपविल्याची कबुली देणारी चिठ्ठी पोलिसांना त्यांच्या फ्लॅटमध्ये आढळली आहे.

जोशी दाम्पत्याची देखभाल करणाऱ्या महिलेच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर तिने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. मुरलीधर जोशी हे पत्नी लता यांच्यासह उंबरखेड (जि. जळगाव) येथील एका शाळेत मुख्याध्यापक होते. निवृत्त झाल्यानंतर २०१७ मध्ये ते जेलरोड येथे राहण्यास आले होते. लता जोशी या आजाराने त्रस्त होत्या. ब्रेन हॅमरेजमुळे त्या दीड महिना कोमामध्ये होत्या. बऱ्या झाल्यानंतरही त्यांना अन्य व्याधी जडल्या होत्या.

पत्नीचे सततचे आजारपण व एकाकीपणाला कंटाळून मुरलीधर जोशी यांनी गळा आवळून तिची जीवनयात्रा संपवली, अशी माहिती उपनगर पोलिसांनी दिली. जोशी दाम्पत्याची दोन्ही मुले उच्चशिक्षित असून, मुंबईत उच्च पदावर नोकरीस आहेत. हे दाम्पत्य पंधरा दिवसांपूर्वीच मुंबईला त्यांच्या मुलांकडे राहून आले होते. विरंगुळा म्हणून दोघेही ज्येष्ठ नागरी संघाचे सभासदही झाले होते. पत्नीच्या उपचारांवर लाखो रुपये खर्च करूनही त्यांना आराम पडत नसल्याने हे टोकाचे पाऊल उचलण्यात आले असावे, अशी माहिती नातेवाइकांनी दिली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.